ETV Bharat / city

14 Villages Merged In Navi Mumbai : ठाण्यातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या ( Navi Mumbai Municipal Corporation ) हद्दीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला ( 14 Villages Merged In Navi Mumbai ) आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी विधानभवनात ही माहिती दिली. या गावांना सर्व सुविधा महापालिकेकडून पुरविण्यात येणार आहेत.

author img

By

Published : Mar 24, 2022, 6:49 PM IST

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील चौदा गावे ( 14 Villages In Thane District ) आजपासून नवी मुंबईत समाविष्ट करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी आज ( 14 Villages Merged In Navi Mumbai ) केली. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ नवी मुंबई महानगरपालिकामध्ये ( Navi Mumbai Municipal Corporation ) समाविष्ट करण्यात आली आहेत. गेल्या सात ते आठ वर्षापासून या गावांना नवी मुंबई महानगरपालिकामध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात होती. मात्र माझ्याकडे दोन वर्षापासून नगरविकास खातं आल्यानंतर याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला आज यश आलं, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. ही चौदा गाव नवी मुंबई महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यामुळे मूलभूत सुविधा महानगरपालिकेकडून पुरवल्या जातील, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राजकीय वापरासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सातत्याने पडत आहेत. केवळ राजकीय वापरासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असून, सूडबुद्धीने या कारवाया सुरू आहेत. कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्यात काही गैर नाही. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत केवळ केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होत असल्याच दिसत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

आयपीएलच्या सुरक्षेवर गृहविभागाची नजर : 26 मार्चपासून आयपीएलचे सामने मुंबईत सुरू होत आहे. मात्र आयपीएलचे सामने खेळले जाणाऱ्या स्टेडियमच्या परिसराची अतिरेक्यांकडून रेकी झाली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आयपीलच्या सुरक्षेची जबाबदारी गृविभाग याबाबत योग्य काळजी घेत असून, यासंबंधी योग्य ती चौकशी केली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी गडचिरोली पोलीस भरती : गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोलीमधील पोलिसांची भरती थांबवण्यात आली होती. मात्र, गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोलीतील पोलिसांची भरती आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गृहविभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पोलीस भरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर ही पोलीस भरती चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.