मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना, कामगारांना तरुणांना, महिलांना आणि कष्टकरी सामान्य जनतेला अर्थमंत्र्यांनी हा पूरक असा अर्थसंकल्प सादर केला आहे. विरोधक मात्र विरोधाचं काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टी कडे जास्त लक्ष देऊन आम्हाला तरी चालणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
विरोधी पक्षाच टीका करणं हेच काम-
राज्यातले विरोधक आपली विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत आणि ते या अर्थसंकल्पावर ती टीका करत आहेत. विरोधी पक्षाच टीका करणं हेच काम आहे. त्यामुळे ते टीका करण्याचं काम करत आहेत. परंतु त्यांनी अर्थसंकल्पामध्ये ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी अर्थमंत्र्यांनी तरतुदी केल्या आहेत. त्यावरती जरा लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून त्यांना कळणार की, अर्थमंत्र्यांनी कोण- कोणत्या गोष्टीवरती कशी तरतूद दिलेली आहे. महिला दिनानिमित्त महिलांना जी विशेष सूट अर्थमंत्र्यांनी दिली आहे. ती यापूर्वी भाजपच्या सत्तेतील सरकारने कधीच दिली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी जरा अर्थसंकल्प हा नीट वाचला पाहिजे, अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम-
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर काल (सोमवार) सादर केला. तो कोविडच्या काळातील अर्थसंकल्प आहे. त्यामुळे महसुली उत्पन्नात जरी तूट झाली असली तरीही अर्थमंत्र्यांनी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प हा योग्य पद्धतीने मांडलेला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केलेला आहे.
हेही वाचा- मुंबईत लसीकरणानंतर एका वृद्धाचा मृत्यू