ETV Bharat / city

विशेष! कोरोना काळात कुली वर्ग करतोय जगण्यासाठी संघर्ष - starvation time come on Coolie

जगाचे ओझे आपल्या डोक्यावर आणि पाठीवर वाहणाऱ्या कुलींवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी तर आपल्या गावची वाट धरली आहे.

corona lockdown effect on Coolie
कुली कामगार मुंबई
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:27 PM IST

मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे गेले 3 महिन्यांपासून भारतीय रेल्वेने अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्या. याचा परिणाम लहान मोठ्या व्यावसायांबरोबरच दुसऱ्यांचे ओझे वाहून नेणाऱ्या कुली कामगार वर्गावरही झाला. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे ओझे डोक्यावर खांद्यावर वाहून नेणाऱ्या, या कुलींचे जीवन कोरोनामुळे बिकट झाले आहे. सध्या या वर्गावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

लॉकडाऊनपूर्वी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज विविध राज्यांतून हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबईतील स्थानकावर उतरत असत आणि तितक्याच संख्येने परतीचा प्रवास करत होते. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी स्टेशनवर उभ्या असलेल्या गाडीत सामान वाहून नेण्याचे काम कुलींना मिळत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक ठप्प झाल्याने कुलींपुढे उदरनिर्वाह करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगाचे ओझे आपल्या डोक्यावर आणि पाठीवर वाहणाऱ्या कुलींवर सध्या उपासमारीची वेळ..

हेही वाचा - विशेष! राजस्थानातील पाणी संकटावर श्री कर्ण नरेंद्र कृषी विद्यापीठाने शोधला उपाय

अनेकांनी धरलीये गावची वाट...

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने आणि अर्थार्जन बंद झाल्याने मुंबईत काम करत असलेल्या अनेक कुलींनी आपल्या गावची वाट धरली आहे. अनेक कुली स्थानकांवरील विश्रांतीगृहात तर काही भाड्याच्या घरात, तर काही आठवड्यातून एकदा गावी जात असत. मात्र, आता पैसेच हाती मिळत नसल्याने अनेकांनी आपल्या गावी मुक्काम केला आहे. मुंबईच्या मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर जवळपास 2 हजार कुली कार्यरत आहेत. यातील बहुतांश कुली हे महाराष्ट्रातील नाशिक, सातारा व पुणे येथील आहेत.

गरजूंना देण्यात येणाऱ्या जेवणातून पोटाची भूक भागवतोय...

अगोदर रोजंदारीवर काम करत असल्याने दोन वेळच्या जेवणाच्या सोयीपुरते पैसे मिळायचे. मात्र, आता तेही बंद झाल्याने कुटुंबाला घेऊन गावी आलो आहे. आता काही ओळखीच्या लोकांकडून उसनवारी पैसे घेऊन जीवन जगतो आहे. रेल्वे सुरू झाली की मुंबईला येऊन पैसे परत करणार, असे मुंबई सेंट्रल स्थानकातील कुली आकाश घुगे यांनी सांगितले. तर प्रवासी गाड्या बंद असल्याने स्टेशन परिसरात मिळेल ते काम करतो. त्यातून काही वेळा स्टेशन मास्टर, टीसी हे जेवण देतात. तर काही वेळा गरजूंना देण्यात येणाऱ्या जेवणातून पोटाची भूक भागवून स्टेशनवरच दिवस घालवत असल्याचे कुली निर्मल यांनी सांगितले.

सगळ्यांकडे मदत मागितली. मात्र...

भारतीय रेल्वेच्या इतिहासात कुलींचा स्थान आहे. मात्र, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्यासाठी आर्थिक मदत करावी, यासाठी रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्री, रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणीच त्याची दखल घेतली नसल्याचे ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनचे मुंबई सेक्रेटरी अशोक आव्हाड यांनी सांगितले.

मुंबईत कुली हे सकाळी 8.30 ते 5.30 व संध्याकाळी 5.30 ते सकाळी 8.30 या दोन वेळेत काम करतात. लॉकडाऊनपूर्वी या वेळेत काम करणाऱ्या कुलींना दिलेल्या नंबरनुसार ओझे वाहण्याच काम मिळत असे. त्यातून दिवसाला किमान 200 ते 300 रुपये हाती येत. आता गेले 2 महिने गाड्या बंद असल्याने कुली स्थानकांवर फिरकत नव्हते. लॉकडाऊनपूर्वी सीएसएमटी स्थानकात 94 कुली दोन शिफ्टमध्ये काम करत. आता स्पेशल गाड्या सुरू झाल्यापासून 15 ते 20 कुली सीएसएमटी स्थानकात कामाला येतात. कुलींची संख्या आता कमी असल्याने किमान 500 रुपये तर दिवसाला सामनाचे ओझे वाहून नेल्यावर मिळत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.