ETV Bharat / city

Aryan Khan drugs case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांचे संशयास्पद वर्तन; एनसीबीने ही दिली प्रतिक्रिया

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात ( Cordelia Cruz drug case ) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan khan ) याला त्याचा जिवलग मित्र अरबाज मर्चंटसह गेल्या वर्षी ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींचा समावेश असलेल्या तपासादरम्यान 7 ते 8 एनसीबी अधिकाऱ्यांनी संशयास्पद वर्तन ( Allegations of suspicious behavior by NCB officials ) केल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. या 7 ते 8 एनसीबी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

Aryan Khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण
author img

By

Published : Oct 19, 2022, 6:45 AM IST

Updated : Oct 19, 2022, 2:35 PM IST

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात ( Cordelia Cruz drug case ) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan khan ) याला त्याचा जिवलग मित्र अरबाज मर्चंटसह गेल्या वर्षी ताब्यात घेण्यात आले होते. एनसीबीच्या विशेष अंतर्गत अहवालात एनसीबीने केलेल्या तपासणीत अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचा समावेश असलेल्या तपासादरम्यान 7 ते 8 एनसीबी अधिकाऱ्यांनी संशयास्पद वर्तन ( Allegations of suspicious behavior by NCB officials ) केल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे. या 7 ते 8 एनसीबी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

दक्षता एसआयटीने सक्षम अधिकाऱ्याकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात संबंधित लोकांच्या संपूर्ण चौकशीचे सर्व तपशील आहेत. पुढे काहीही माहिती उघड करू शकत नाही. एनसीबी तपासात 'अनियमितता' नोंदवल्याबद्दल एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

  • Drugs on cruise case | The Vigilance SIT has submitted its report to the competent authority. The report has all the details of the full probe of the people involved. Can't reveal anything further: NCB Dy Director-Gen Gyaneshwar Singh, on reported 'irregularities' in NCB probe pic.twitter.com/pSsi3f7LiV

    — ANI (@ANI) October 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

NCB चा तपास पारदर्शक नसल्याचा आरोप : एनसीबी अहवालातील या निष्कर्षांमुळे एनसीबी आणि आर्यन खान प्रकरणात गुंतलेल्या काही अधिकाऱ्यांवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. SRK च्या मुलाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली असली तरी, दोन राजकीय व्यक्ती आणि चित्रपट सृष्टीतील अनेकांनी ड्रग्स प्रकरणाचा NCB चा तपास पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता.

सेवा न देणाऱ्यांवर कारवाई : विशेष तपासादरम्यान, 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले, तर स्कॅनरखालील अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचे बँक तपशील आणि इतर आर्थिक तपशीलांचीही छाननी करण्यात आली. यातून काही अधिकारी व व्यक्तींनी ३ ते ४ वेळा आपला जबाब बदलला. अहवालानुसार, बहुतांश अधिकारी एनसीबी विभागातील आहेत. तथापि, सध्या एनसीबी विभागात सेवा न देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्राधिकरणाला अहवाल सादर केला जाईल.

दोषी अधिकाऱ्यांवर दोन प्रकारे करवाई : एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबीच्या उच्च अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने एसआयटी आपला दक्षता अहवाल विजिलेंस रिपोर्ट आज दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात सादर केला. आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती. SIT ला इतर संबंधित आणि असंबंधित प्रकरणांच्या तपासातही त्रुटी आढळल्या. आता दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दोन प्रकारे करवाई करण्यात येते. गंभीर आरोप असल्यास सेवेतून बड़तर्फ केले जाते तर सौम्य आरोप असल्यास दंडात्मक करवाई करण्यात येते.

Last Updated : Oct 19, 2022, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.