ETV Bharat / city

आमदार लाड म्हणाले सेनाभवन फोडू: मुख्यमंत्र्यांचा 'थापड' मारण्याचा इशारा, मग कायदा सुव्यवस्था राखायची कोणी ? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना स्टाईलने विरोधकांना सूचक इशारा दिला. एक झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दांत विरोधकांचे मुख्यमंत्र्यांनी कान पिरगाळले. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Edited Image
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 2, 2021, 6:53 PM IST

Updated : Aug 2, 2021, 10:08 PM IST

मुंबई - भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळ पडल्यास शिवसेना भवन फोडण्याचे वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद उभा राहिला आहे. त्या वादात आता संजय राऊत आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उडी घेतल्याने चांगलेच राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत थापड देण्याचा विरोधकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यातून त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचे काम केल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जवाबदारी असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच असा 'थापड' मारण्याचा इशारा दिल्याने राजकीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आमदार लाड म्हणाले सेनाभवन फोडू: मुख्यमंत्र्यांचा 'थापड' मारण्याचा इशारा

मुंबईतील माहीम भागात भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीका करताना वादग्रस्त विधान केले. 'आता आपण माहिममध्ये आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असे यांना वाटते. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,' असे लाड म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, लाड यांना आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला लगावला. मात्र या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे असताना प्रसाद लाड यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे सांगत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सारवासारव सुरू केली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना स्टाईलने विरोधकांना सूचक इशारा देताना, ‘थप्पड से डर नही लगता’ या अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्या त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा देऊ. त्यामुळे आम्हाला कोणी थपडा मारण्याची धमकी देऊ नये, असे सांगत एक झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दांत विरोधकांचे कान पिरगाळले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून देखील मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून थापड देण्याची भाषा अपेक्षित नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आशा भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

प्रविण दरेकर, भाजप नेते

थापड देण्याच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोश

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेने काँग्रेससमोर लोटांगण घातले. तसेच बाळासाहेब ठाकरे हयात असतानची जी, शिवसेना होती, ती शिवसेना आता राहिली नाही, अशा वक्तव्यातून भारतीय जनता पक्षाने नेहमीच शिवसेनेला डिवचण्याचे काम केले. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करावे, याबाबत राजकीय वर्तुळात नक्कीच मतमतांतरे असू शकतील. मात्र त्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख देखील आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमातून नाव न घेता समाचार घेतला. थापड देण्याच्या वक्तव्यामुळे शिवसेनेने आपला आक्रमकपणा अजूनही सोडला नाही, हा संदेश मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच आपल्या भाषणातून त्यांनी,'ठाकरी शैलीची' पुन्हा एकदा चुणूक दाखवली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये देखील या वक्तव्यामुळे जोश निर्माण झाल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे. हे वक्तव्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी वेधण्याचे काम केल्याचे विश्लेषकांकडून सांगण्यात येते आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 ऑगस्ट रोजी वरळी येथील बीडीडी चाळीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वार येथे असलेल्या परिसरात अदानी समूहाकडून 'अदानी एअरपोर्ट' असा फलक लावण्यात आला होता. हा फलक शिवसैनिकांकडून तोडण्यात आला. मुंबईत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव हे 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' आहे. अदानी एअरपोर्ट नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली पाहायला मिळाली.

प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

आमदार प्रसाद लाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. खासदार संजय राऊत, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसेच भारतीय जनता पक्षाला इशाराही दिला आहे. विनाकारण शिवसेनेला डीवचू नका, वाघाने पंजा उगारला तर महागात पडेल, असा सज्जड इशारा आमदार सुनील राऊत यांनी ट्विटरवरून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात शाब्दिक वादावादी सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'आघाडी' सरकारच्या नेत्यांची प्रसाद लाड यांच्यावर टीका

आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडणार असल्याच्या वक्तव्यावर आघाडी सरकारच्या इतर दोन पक्षांच्या नेत्यांकडून देखील टीका केली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अधून-मधून विनोद करण्याची हुक्की येते, अशी खिल्ली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उडवली आहे. तर भाजपाची जी प्रवृत्ती आहे, तेच त्यांच्या वाक्यातून समोर येते असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला आहे.

Last Updated : Aug 2, 2021, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.