ETV Bharat / city

कोरोनाशी लढा; मुंबईत पीपीई कीटची शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाते विल्हेवाट - महानगर पालिका मुंबई

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 27 हजारावर तर मृतांचा आकडा 900 वर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांपासून मृतदेह हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर करावा लागत आहे. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर झाल्यावर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही.

PPE
पीपीई कीटची विल्हेवाट लावताना कर्मचारी
author img

By

Published : May 23, 2020, 5:40 PM IST

Updated : May 24, 2020, 7:45 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या वापरलेल्या पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्कपासून कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून जैव वैद्यकीय (बायो मेडिकल) कचऱ्याबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या व नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी दिली.

कोरोनाशी लढा; मुंबईत पीपीई कीटची शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाते विल्हेवाट

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 27 हजारावर तर मृतांचा आकडा 900 वर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांपासून मृतदेह हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर करावा लागत आहे. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर झाल्यावर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. त्याला जैव वैद्यकीय कचऱ्यात टाकावे लागते. जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कची विल्हेवाट लावली जाते.

पालिका आणि खासगी रुग्णालयात तसेच इतर ठिकाणी वापरण्यात आलेले पीपीई कीट, ग्लोज, मास्क पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगेमध्ये एकत्र केले जातात. तसेच रुग्णालयातील इतर जैविक कचरा काळ्या बॅगेत गोळा करण्यात येतो. मुंबई महापालिकेने शहरातील जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट एसएमएस या कंपनीला दिले आहेत. या कंपनीचे देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ प्लान्ट आहे. या प्लान्टमध्ये पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा तसेच जैविक कचरा गोळा करून जाळला जातो. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा कचरा जाळला जात आहे. त्यामुळे या कचऱ्यापासून मुंबईकरांना लागण होण्याची शक्यता नसल्याचे खान यांनी सांगितले.

मुंबईत 3 हजार मेट्रिक टन जैविक कचरा

मुंबईत काही वर्षापूर्वी 9 हजार मेट्रिक टन कचरा गोळा केला जायचा. नागरिकांनी आपल्या घराजवळ, सोसायटीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा नियम केल्याने सध्या मुंबईत 7 ते 7 हजार 500 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यात सुमारे 3 हजार मेट्रिक टन जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचरा असतो. हा कचरा रुग्णालये, दवाखाने आदी ठिकाणाहून गोळा केला जातो.

काय आहे जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचरा

रुग्णांवर उपचार करताना लागणारे साहित्य, इंजेक्शन, सलाईन बॉटल, कापूस, बँडेज, रुग्णाच्या शरीराचे अवशेष आदीला जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचरा म्हटले जाते. या कचऱ्याला आपल्या नेहमीच्या कचऱ्यात टाकता येत नाही. हा कचरा जाळावा लागत असल्याने पालिकेने त्यासाठी एमएमएस या कंपनीला कंत्राट दिले आहे. ही कंपनी मुंबईमधील जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावते.

Last Updated : May 24, 2020, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.