ETV Bharat / city

राजकारणातील कट्टर 'हाडवैऱ्यांचा' एकाच दिवशी वाढदिवस; महाविकास आघाडीला दोघांनी असा लावला होता 'सुरुंग' - महाविकास आघाडी वादाची बातमी

राष्ट्रवादीचे गटनेते असलेले अजित पवार हे महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या विरोधात होते. त्यातच 23 नोव्हेंबरला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणातील कट्टर विरोधकांनी एकत्र येत भल्या पहाटे शपथविधी उरकला. त्यांच्या शपथविधीनंतर अनेकांची झोप उडाली.

Devendra Fadnavis And Ajit Pawar
शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
author img

By

Published : Jul 22, 2021, 2:32 PM IST

मुंबई - आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सुप्रसिद्ध असलेले नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. तर भारतातील सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वेगळी ओळख आहे. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडी स्थापन करण्याची चर्चा सुरू असताना या कट्टर विरोधकांनी भल्या पहाटे शपथविधी उरकून राज्यात खळबळ उडवून दिली होती. या दोन्ही हाडवैऱ्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस साजरा होत आहे. या दोन्ही नेत्यांच्या कामाचा त्यांच्या वाढदिवशी ईटीव्ही भारतने घेतलेले हा विशेष आढावा.

देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा इतिहास देवेंद्र फडणवीसांच्या नावावर

देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे सदस्य होते. तर देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय होते. नागपूरमधील रामनगरमधून देवेंद्र यांनी 1992 मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याच्या पुढच्या निवडणुकीत म्हमजे 1099 ला देवेंद्र हे भरघोष मताधिक्याने निवडून आले. यावेळी त्यांनी भारतातील सर्वात तरुण महापौर म्हणून इतिहास रचला.

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून गाजला देवेंद्र फडणवीसांचा काळ

देवेंद्र फडणवीस हे 1999 ला विधानसेभेत निवडून गेले. त्यानंतर भाजपचे तरुण प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र त्यांचा काळ गाजला तो, महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून. यापूर्वी भाजपने शिवसेनेसोबत युती करुन 1995 ला सत्तेत वाटा मिळवला होता. शिवसेनेचे मनोहर जोशी आणि त्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. तर गोपीनाथराव मुंडे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. मात्र 31 ऑगस्ट 2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आणि राज्यात भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले अनेक निर्णय गाजले, तर काही वादग्रस्तही ठरले आहेत.

मुख्यमंत्री पदावरुन तुटली भाजप-शिवसेनेची युती

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची राज्यातील धुरा सांभाळल्यानंतर भाजपची महाराष्ट्रात घौडदौड सुरू झाली. मात्र याची धास्ती शिवसेनेने घेतली. भाजप शिवसेनेशी युती करुन शिवसेनेलाच संपवत असल्याची भावना सेनेतील काही चाण्यक्यांची झाली. यात सत्तेत असतानाही शिवसेना आणि भाजपमध्ये खटके उडत राहिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण राखले. यातच शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वादाची ठिणगी पडली. भाजपचे 105 आमदार निवडून आले असताना शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केली. अमित शाह यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली. मात्र भाजपकडून असा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता. उलट मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच युतीने मत मागितल्याचे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आले. यावरुन सेना भाजप युती तुटली. त्यातच शिवसेनेने राष्ट्रवादी या भीन्न विचारधारा असलेल्या आणि त्यांच्याच विरोधात प्रचार केलेल्या पक्षासोबत मोट बांधण्याची चर्चा सुरू केली.

देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी असा लावला महाविकास आघाडीला 'सुरूंग'

शिवसेना राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन करण्याची चर्चा संजय राऊत यांनी सुरू केली. मात्र राष्ट्रवादीतील अनेक नेते या आघाडीमुळे नाराज होते. राष्ट्रवादीचे गटनेते असलेले अजित पवार हे देखील या निर्णयाच्या विरोधात होते. त्यातच 23 नोव्हेंबरला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणातील कट्टर विरोधकांनी एकत्र येत भल्या पहाटे शपथविधी उरकला. त्यांच्या या शपथविधी सोहळ्यामुळे अनेकांची झोप उडाली. मात्र अजित पवारांचे हे बंड फार काळ टिकले नाही. अवघ्या 80 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी स्थापन केलेले हे सरकार कोसळले. त्यानंतर अजित पवार यांनी घरवापसी करत पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाले.

शरद पवारांचे पुतणे ते उपमुख्यमंत्री, अशी बहरली अजित पवारांची राजकीय कारकीर्द

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै हा वाढदिवस आहे. अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव. राज्याच्या राजकारणात त्यांचा दरारा कायमच असतो. त्यांच्या कार्यशैलीला भलेभले अधिकारी देखील घाबरतात. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे आहेत. राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची ही जोडी खूप प्रसिद्ध आहे. २०१९ मधील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. यातच अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. उपमुख्यमंत्री पद असण्यासोबतच अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत.

'काका'साठी सोडली पुतण्याने बारामतीची खासदारकी. . .

अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. मात्र त्यांनी ही जागा आपले काका शरद पवार यांच्यासाठी सोडली होती. काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून विधानसभेवर आमदारकी मिळवली. १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये अजित पवार आमदार म्हणून या मतदार संघातून निवडून आले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे भूषवले. २००४ मध्ये ते पुण्याचे पालकमंत्री होते. आताही ते पुण्याचे पालकमंत्री आहेत.

देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची ऐतिहासिक 'शपथ'

अजित दादांनी २०१९ मध्ये संपूर्ण राजकारण ढवळून टाकले. ही निवडणूक सर्वार्थाने आजवरची चर्चेतील निवडणूक ठरली आहे. निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली महाविकास आघाडी आणि ऐनवेळी भाजपला पाठिंबा देणारे अजित पवार.... यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण आजवरचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यांनी भल्या पहाटे उरकलेला शपथविधी देखील बराच गाजला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण तीन दिवसांच्या आतच अजित पवारांचं हे बंड शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याने फडणवीस यांचे सरकार अवघ्या ८० तासात कोसळले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.