मुंबई - राज्य सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. इंधर दरवाढी संदर्भात कॉंग्रेसची भूमिका काय आहे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) तसेच उर्जा विभाग आणि समृद्धी महामार्गातील पैशे वाटपाच्या संदर्भात कॉंग्रेसचे म्हणणे काय आहे, या सगळ्या विषयात काँग्रेसची काय भूमिका काय, यासंदर्भात ईटीव्ही भारतने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याशी केलेली खास बातचीत...
प्रश्न - सध्या राज्यांमध्ये विविध आरोप होत आहेत. दोन जबाबदार नेते एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप करत आहेत. या परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय आहे?
नाना पटोले - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्या नकली नोटा बनवणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा काय संबंध ..प्रधानमंत्री यांच्यासोबत त्यांचे काय संबंध आहेत हे कसे समजायचं. तो भाटी नावाचा माणूस कसा प्रधानमंत्रीच्या जवळ आहे या सगळ्या गोष्टी चे पुरावे आज राज्याच्या मंत्र्यांनी दिलेले आहे. खर तर या दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या गोष्टी गंभीर आणि खरं तर महाराष्ट्राची प्रतिमा या आरोपांमध्ये निश्चितपणे मलीन होत आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पुराव्यासहित जनतेसमोर ठेवले गेले पाहिजे.
प्रश्न - आपण या प्रकरणांच्या चौकशीची मागणी करणार काय...
नाना पटोले - मुख्यमंत्रीपदावर असताना ही नकली नोट बनवणाऱ्या व्यक्तीला साथ सोबत घेतलं जात असेल तर निश्चितपणे देशद्रोहाचा त्याच्यामध्ये संबंध होतो. या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हावा अशी काँग्रेस राज्य (state congress) सरकारकडे मागणी करेल आणि हे सगळे पुराव्यासहित जनतेच्या समोर आले पाहिजे या प्रकरणाची चौकशी व्हावी.
प्रश्न - या राज्यांमध्ये असलेल्या प्रश्नांपेक्षा विरोधकांना कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे अशा पद्धतीचे चित्र निर्माण होत आहे हे खरे आहे का...
नाना पटोले - यांना सत्तेची लालसा लागलेली आहे सत्ता गेल्यापासून ते पागल झालेले, बेभान झालेले आपल्याला लक्षात येत असेल. राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात देशात राजकारण राज्यामध्ये सुरू झालेल आहे आणि रोज आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचार रोज प्रकार सुरू आहेत आणि जनतेचे प्रश्न केंद्र सरकारने नरेंद्र मोदीचे सरकार २०१४ मध्ये आल्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये आल्यानंतर त्यांनी जनतेला दिले होते ते आश्वासन पाळले गेले नाही. देश जागतिक महासत्ता करण्याचं स्वप्न दाखवली होती. चायनाच्या ताब्यात देण्याचा तो प्रयत्न सुरू झालेला अरुणाचलमध्ये अनेक भागांमध्ये चीनने आणि आपला कब्जा केलेला आहे देशांमध्ये कृत्रिम महागाई वाढवणं, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवल्या. तीन काळे कायदे शेतकऱ्यांचा विरोधात केले गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. बोरोजगारी मोठ्या प्रमाणात या देशांमध्ये वाढवणा-याचे कृत्य केंद्रामध्ये बसलेलं मोदीचं भाजप सरकार करते आहे आणि हे सगळे प्रश्न लोकांच्या समोर येऊ नये यासाठी या पद्धतीचं व्यक्तिगत आरोप करून भाजप राजकारण करत आहे हे आता स्पष्ट झाले.
प्रश्न - केंद्रामध्ये जर आपण पाहिलेत. इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत परंतु एक विरोधक म्हणून एक सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस अजूनही तितक्याच ताकदीने समोर दिसत नाही..
नाना पटोले - देशभारत इंधनदरवाढ विरोधी आंदोलन केले आणि राज्यात सरकार असताना सुद्धा गुन्हे दाखल झाले .आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढलो आमच्या राज्य गुन्हे दाखल झाले. येत्या १४ तारखेपासून १९ तारखेपर्यंत आम्ही एक सप्ताह साजरा करणारा आणि या सगळ्या महागाई बेरोजगारी आणि शेतकरी विरोधी आणि गरिबांच्या विरोधात राज्य सरकार केंद्र मध्ये बसले त्याचा खरं चित्र आम्ही लोकांच्या समोर आणणारा आणि त्यासाठी राज्यातील सगळे आमचे मंत्री आमचे सगळे आमदार काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही एक मोठा अभियान घेणारा आहे. एक दिवस किंवा दोन दिवस जेलभरो आंदोलन करणार
प्रश्न - तीव्र आंदोलन करून केंद्राला धडा शिकवावा, अशा पद्धतीची काही रणनिती आहे का...
नाना पटोले - काँग्रेस अहिंसावादी पक्ष आहे,.आणि त्यामुळे लोकशाही मार्गाने हे आंदोलन लढल जाईल आणि आम्हाला माहित आहे की महात्मा गांधीचे विचारानेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे महात्मा गांधीच्या विचाराच पालन करून आमचा आंदोलन राहणार.
प्रश्न - विधान परिषदेचे अधिवेशन होणारप आहे या अधिवेशनामध्ये जनतेच्या कोणत्या प्रश्नांची तड लागण्याची शक्यता आणि मूळामध्ये या अधिवेशनासाठी अद्यापही विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही.
नाना पटोले - या अधिवेशनामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि जनतेचे प्रश्न त्याच्या मध्ये केंद्र सरकारने जो ५१ लाख कोटीच्या वर अजून पर्यंत राज्याच्या जीएसटीचा पैसा दिलेला नाही तरी राज्य सरकारांनी केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे दुष्काळ हा मागच्या दोन-तीन वर्षापासून आम्ही पाहतो आहे. त्याच्यात दहा हजार- वीस हजार कोटी रुपयांची मदत करण्याची भूमिका घेतली होती ती अपुरी पडत होती त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदा केंद्र सरकारने आणले आणि म्हणून राज्य सरकारने या कायद्याच्या विरोधात कायदा महाराष्ट्र पण ही मागणी आमची होती. ती या अधिवेशनामध्ये त्या कायद्याचा विरोध करणारा कायदा महाराष्ट्रात शेतकर्यांच्या हिताचा कायदा बनवला जाईल. अशा अनेक मुद्दे घेऊन या अधिवेशनात काम केलं जाईलॉ
प्रश्न - विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान होते तर महाविकास आघाडी म्हणून आपण याच्या मध्ये उतरतात आणि किती प्रमाणात मध्ये आपल्याला याच्यामध्ये यश येईल
नाना पटोले - शंभर टक्के रिझल्ट आम्हाला येणार महा विकास आघाडीचे सहकारी म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्या आम्ही सर्व जागा नक्की जिंकू
प्रश्न - गेल्या एक वर्षापासून राज्यपालांकडे बारा सदस्यांचा प्श्न प्लंबित आहे. या संदर्भात सातत्याने आपण प्रयत्न करत आहे त्याला यश का येत नाही...
नाना पटोले - लोकशाही मानणारी व्यवस्था संपुष्टात येत आहे त्याचा हा परिणाम आहे. बारा आमदार राज्यपाल नियुक्त असतात त्याला मुद्दामून ठेवला गेला आणि माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांचे पावर वापरायला पाहिजे होते पण त्यांना दिल्लीमध्ये बसलेलं मोदी सरकार हे त्यांचे आवडते काम करतात, त्यांच्या इशाऱ्यावरच हे चालतात हे सिद्ध झालेले आहे.
प्रश्न - मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेंडिंग आहेत ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न होतोय.या संदर्भामध्ये काय भूमिका आहे
नाना पटोले - त्या संदर्भातली जी मागणी केंद्राकडून येणार या समाजाच्या आरक्षणास संदर्भातला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे., मराठा आरक्षणाच्या बाबत आहे या सगळ्या प्रश्नाला बगल देण्याचे पाप हे भाजपने केलेला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून संविधानिक व्यवस्थेला तोडण्याचा पापे सातत्याने भाजप करते आहे. ३४० प्रमाणे ओबीसी समाजाला जे काही राजकीय सामाजिक शैक्षणिक अधिकार आहे ते मिळू नये यासाठी त्या वेळच्या फडणवीस सरकारने केलेला प्रयत्न आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सातत्याने मागून सुद्धा इंपिरिकल डेटा न देणे. या सगळ्या गोष्टी लक्षात येतं की केंद्रात आणि विशेष करून भाजप भाजप मानसिकताही ओबीसी विरोध मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे हे सिद्ध करणार आहे. राज्य सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये ५० टक्केच्या वर आरक्षण या व अशा पद्धतीने ठराव करून दिला. भाजपने सभात्याग करून त्या कायद्याचा विरोध करून ते बाहेर गेले होते. पण जेव्हा दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये चर्चा आली केंद्र सरकारने ५० टक्केच्या वर आरक्षण देण्यासाठी विरोध केला आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षण असो हे मिळू नये याला भाजपचा जो सातत्याने प्रयत्न आहे त्याच्यामुळे ते यशस्वी होतात आहे. पण मराठा आणि ओबीसी लोकांना समजलेला आहे की आरक्षण विरोधी बीजेपी मानसिकता आणि त्याचे परिणाम बीजेपीला भोगावे लागतील...
प्रश्न - जलशिवार योजना, ऊर्जा विभागातील पायाभूत सुविधा, समृद्धी महामार्ग मध्ये अनियमितता झाली आहे का या संदर्भामध्ये आता राज्य सरकारची भूमिका काय असेल...
नाना पटोले - उर्जा विभागातले पायाभूत सुविधा असोत. समृद्धी मार्ग मध्ये देण्यात आलेल्या पैशासंदर्भात राज्य सरकारने चौकशी करून त्याचे निराकरण करणे हे सरकारचे जवाबदारी असते घोटाळे झाले आहेत समृद्धी मार्गामध्ये घोटाळे झाले आहेत आणि ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांच्या नावाने पैसे खाल्ले गेलेले आहे त्याच्यामध्ये आर्थिक मोठे घोटाळे झाले आहे ते पण त्याला मध्ये आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन त्यांनी घोटाळे केले त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आण्ही करीत आहोत.