मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी जत्रेला (Anganewadi Jatra) जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर विशेष मेल एक्सप्रेस गाड्या (Special Trians to Anganewadi Jatra) चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या जत्रेसाठी एलटीटी आणि दादरहून सावंतवाडीसाठी 10 विशेष एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. एलटीटी ते सावंतवाडी 2 आणि दादर ते सावंतवाडी 8 अशा या दहा एक्स्प्रेस असणार आहे.
प्रवाशांना मिळणार दिलासा-
आंगणेवाडी जत्रेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात जात असतात. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या, कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण प्रवाशांना मिळत नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने 10 एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी आणि दादरहून सावंतवाडीसाठी 10 विशेष एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत. एलटीटी ते सावंतवाडी 2 आणि दादर ते सावंतवाडी 8 अशा या दहा एक्स्प्रेस असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एलटीटी सावंतवाडी एक्स्प्रेस-
ट्रेन क्रमांक 01161 विशेष एलटीटी सावंतवाडी एक्स्प्रेस ही गाडी 23 फेब्रुवारी 2022 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01162 विशेष सावंतवाडी एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी 24 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी पोहोचले.
दादर - सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस-
गाडी क्रमांक 01163 दादर सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस 16 मार्च ते 19 मार्च 2022 पर्यंत दररोज दादर स्थानकांवरून सकाळी 12 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी 11 वाजून 20 मिनिटांनी पोहोचले. गाडी क्रमांक 01164 सावंतवाडी रोड-दादर विशेष एक्स्प्रेस ही गाडी 17 मार्च ते 20 मार्च 2022 पर्यत दररोज रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सावंतवाडी रोड वरून सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.
असे करा आरक्षण-
ट्रेन क्रमांक 01161/01162 आणि 01163 /01164 या विशेष गाड्यांचे तिकिटाचे आरक्षण सुरू झाले आहेत. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावरून प्रवासी या विशेष गाड्यांचे आरक्षण करू शकते अशी माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे.