ETV Bharat / city

टीईटीत शिक्षकांनी केला पाच वर्षांतील विक्रम; १६ हजार ५९२ शिक्षक झाले पात्र

या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.mahatet.in या उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत पेपर १ हा एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला होता. त्यापैकी १० हजार ४८७ उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन हा एक लाख ५४ हजार ५९६ उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार १०५ उमेदवार पात्र झाले.

sixteen thousands teacher passed in state tet exam

author img

By

Published : Aug 6, 2020, 7:52 AM IST

मुंबई - राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची असलेल्या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील पाच वर्षात सर्वात जास्त उत्तीर्ण होण्याचा विक्रम शिक्षकांनी केला आहे. तब्बल १६ हजार ५९२ शिक्षक हे शिक्षक पदासाठी टीईटीच्या माध्यमातून पात्र ठरले आहेत.

राज्यात टीईटीची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा १९ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर-१ आणि पेपर-२ ला मिळून २ लाख ४३ हजार २८४ शिक्षक परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल २ लाख २६ हजार ६९२ शिक्षक नापास झाले आहेत. तर केवळ तब्बल १६ हजार ५९२ शिक्षक हे उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेकडून पेपर १ (इयत्ता पहिली ते पाचवी गट), तर पेपर २ (इयत्ता सहावी ते आठवी गट) अशा पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.mahatet.in या उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत पेपर १ हा एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला होता. त्यापैकी १० हजार ४८७ उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन हा एक लाख ५४ हजार ५९६ उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार १०५ उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून १६ हजार ५९२ उमेदवार पात्र झाले. या निकालात आरक्षण प्रवर्ग वैकल्पिक विषय अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास येत्या १५ ऑगस्टपर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

टीईटीचा मागील पाच वर्षांतील निकाल असा होता...

वर्ष -पेपर १- पेपर २- एकूण
.....
२०१४- २५६३ - ७०३२- ९५९५
२०१५ - १९०३ -७०८६ -८९८९
२०१७ - ७४४५ - २९२८ -१०३७३
२०१८ - ४०३० -५६४७ -९६७७
२०१९ -१०४८७ -६१०५ -१६५९२

परिक्षा परिषदेकडून २०१६ या वर्षांत अभ्यासक्रम आणि विविध कारणांमुळे टीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.