ETV Bharat / city

एसआयटीचे आर्यन खानला समन्स; आर्यन राहणार अनुपस्थित - आर्यन एसआयटीच्या चौकशीत राहणार अनुपस्थित

शनिवारी दिल्लीहून आलेल्या SIT पथकाने मुंबई NCB कडून तपास करण्यात येणाऱ्या 6 प्रकरणाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली असून सर्व कागदपत्रांची पाहणी सुरू केली आहे. मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र कोणत्या कारणामुळे आर्यन हा अनुपस्थित राहणार आहे ते वाचा...

SIT summons Aryan Khan in Mumbai cruise drugs case
एसआयटीचे आर्यन खानला समन्स; आर्यन राहणार अनुपस्थित
author img

By

Published : Nov 7, 2021, 4:53 PM IST

Updated : Nov 7, 2021, 7:16 PM IST

मुंबई - कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून हे प्रकरण काढून घेतले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी NCBने विशेष चौकशी पथक (SET) स्थापन केले आहे. उद्या (सोमवार)पासून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात येणार आहे. आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) ड्रग्ज-ऑन-क्रूझ-प्रकरणात आज समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, थोडासा ताप असल्याने तो येणार नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले

आर्यन खानला चौकशीसाठी बोलावले -

मुंबईत कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील इतर आरोपींना देखील एनसीबी एसआयटी कडून समन्स देण्यात येणार आहे. या सर्व प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी दिल्लीहून आलेल्या SIT पथकाने मुंबई NCB कडून तपास करण्यात येणाऱ्या 6 प्रकरणाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली असून सर्व कागदपत्रांची पाहणी सुरू केली आहे. मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

साईलच्या आरोपांची चौकशी करणार -

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वात हे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आले आहे. हे पथक क्रुझ कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल, मनीष भानुसली, आणि अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार आहे. प्रभाकर साईलचा जवाब नोंदवून हे पथक दिवाळीपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता.

कार्डेलिया क्रुझवर छापा मारून ड्र्ग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. त्याला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. विशेष चौकशी पथक सोमवारी प्रभाकर साईलने आरोप केलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. पहिल्यांदा ते साईलचा जवाब नोंदवणार आहेत. कारण या कारवाईतील तो प्रत्यक्षदर्शी आहे असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाहरुखची मॅनेजर ददलानीचीही होऊ शकते चौकशी -

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरज पडल्यास शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला चौकशीसाठी बोलावण्यात येईल. आर्यनला पकडल्यानंतर पैसे उकळण्याच्या प्रयत्नात सामील असलेल्या काही व्यक्तींनी ददलानीशी संपर्क साधला होता. 27 ते 30 ऑक्टोबरपर्यंत विशेष तपास पथक मुंबईत होते. त्यावेळी वानखेडेसह आठ लोकांचे जवाब नोंदवले मात्र प्रभाकर साईलशी संपर्क होऊ शकला नव्हता.

हेही वाचा - उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना सुनावली 12 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी; देशमुखांचे वकील म्हणाले...

Last Updated : Nov 7, 2021, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.