मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने Election Commission नावासह चिन्हांची ही विभागणी केली आहे. पक्षप्रमुख ठाकरेंना 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray हे नाव आणि मशाल निशाणी दिली आहे. शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' Balasahebanchi Shiv Sena हे नाव वापण्यास परवानगी दिली आहे. शिवसेना संपवण्याचा सुरु असलेला घाट, उघड्या डोळ्यांनी पहावत नाही. शिवसेनेतील अनेक माजी नेत्यांच्या कुटुंबानी आपली निष्ठा ठाकरेंसोबत कायम असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा जयदीप यांनी 'मी उद्धव काकांसोबत असून हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेने ज्यांना मोठे केले, ते विसरून गेल्याचे ठाकरे म्हणाले.
काकांच्या समर्थनासाठी रिंगणात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत 2 गट तयार झाले आहेत. शिवसेनेची प्रथा, परंपरा असलेला दसरा मेळावा, दोन्ही गटांनी आयोजित केला होता. बीकेसीतील एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा जयदेव ठाकरे, सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे मंचावर दिसून आले आहे. शिवसेना पक्षातील फूट घरभेदी ठरल्याचे बोलले गेले आहे. मात्र, आजही अनेक कुटुंब उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम निष्ठेने उभी आहेत. जयदेव ठाकरे यांचे चिरंजीव जयदीप ठाकरे बाळासाहेब यांच्या मेळाव्यात दिसून आले आहे. ठाकरे कुटुंबावर असलेली निष्ठा. माझे काका उद्धव ठाकरे सध्या अडचणीत आहेत. शिवसेनेने ज्यांना भरभरुन दिले. मोठे केले, नाव दिले त्यांनीच पाठित वार केले आहे. त्यामुळे मी प्रथम कुटुंब आणि काकांना पाठिंबा दिल्याचे जयदीप ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच राजकारणात येण्यास मी इच्छुक असून शिवसेनेसाठी संधी मिळाली, तर पक्ष वाढीसाठी नक्कीच काम करेन. राजकारणात करिअर करावे, अशी माझ्या आईची ही इच्छा होती असेही ठाकरे म्हणाले.
सरमळकर कुटुंबात फूट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कामगार संघटनेचे नेते श्रीकांत सरमळकर मोठे नाव आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या श्रीकांत सरमळकर राजकारणात सक्रिय नाहीत. वांद्रे विधानसभा मतदारसंघात सरमळकर यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. सरमळकर यांचा पुतण्या कुणाल सरमळकर शिंदे गटात गेला असून त्यांच्या कन्या निक्की शास्त्री- सरमळकर या उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. माझ्याकडे पक्षात कोणतेही पद नाही. तरीही ठाकरे यांच्यासोबत असल्याचे निक्की म्हणाले. त्यांचे पती हरी शास्त्री हे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार सेनेचे सचिव आहेत.
कार्यकर्त्यांना विसरल्याने शिंदेंचे समर्थन निवडणूक आयोगाने 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव दिले आहे. शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. आमच्या नावात शिवसेनेत ठाकरे परिवार असून उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरेंचे वशंज आहेत. तसेच शिवसेना हे कुटुंब आहे आणि आम्ही शिवसेना कुटुंबातील सदस्य आहोत. ठाकरेंशिवाय शिवसेनेची कोणीही कल्पना करू शकत नाही. ठाकरेंना शिवसेनेपासून कोणीही वेगळे करू शकत नाही. त्यामुळे आपण ठाकरेंना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांनी सांगितले आहे. शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले. परंतु, पक्ष सत्तेत आल्यानंतर नेतेमंडळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विसरली. सर्वसामान्यांनाही न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळेच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला काम करायचे आहे, म्हणूनच मी शिंदे यांच्यासोबत गेलो, असे सरमळकर यांचा पुतण्या कुणाल सरमळकर यांनी सांगितले आहे.
परिस्थिती वेगळी, म्हणून पाठिंबा पाचोराचे आमदार किशोर पाटील शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांची चुलत बहीण वैशाली सुर्यवंशी या ठाकरेंसोबत आहेत. माझे वडील तात्यासाहेब पाटील यांचे 2019 मध्ये निधन झाले, ते पाचोरा येथून शिवसेनेचे दोनवेळा आमदार होते. मी माझे वडील आणि भावाचा प्रचार करत असलो, तरी मला राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. विभाजनानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे पाचोरा येथे गेले, तेव्हा मी त्यांच्यासोबत होते. मी ठाकरेंसोबत असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
रामदास कदम यांच्या घरातही फूट बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. आमदार योगेश कदम यांनी आधीच शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेत अन्याय होत असल्याची भूमिका कदम यांनी घेतली आहे. मात्र, सिद्धेश कदम हे आजही युवासेनेत आहेत. शिवसेनेतही यावरून बिनसले होते. सिद्धेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.