मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली द्रव्याच्या संबंधात एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) समन्स मिळवल्यानंतर आज दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी सुरू होती. यापैकी श्रद्धा कपूरची चौकशी संपली असून ती घराकडे रवाना झाली आहे. एनसीबीकडून तिची चौकशी तब्बल साडेपाच तासाहून अधिक काळ सुरू होती.
रकुलप्रीत सिंगसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींना एनसीबीने समन्स बजावले आहे. सारा अली खान व श्रद्धा कपूर या दोघी सुशांत सिंह राजपूत सोबत त्याच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर जात होत्या. त्या ठिकाणी अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.