ETV Bharat / city

कोरोनाव्यक्तिरिक्त इतर बातम्या दाखवा, मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी

येत्या रामनवमीला माध्यामांनी कोरोना व्यक्तिरिक्त इतर सकारात्मक बातम्या दाखवण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर
मनसे नेते बाळा नांदगावकर
author img

By

Published : Apr 20, 2021, 1:14 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार भयंकर वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची मानसिक स्थिती बिघडतांना दिसत आहे. मागील १५ महिन्यांपासून सतत कोरोना विषयीच्या बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली आहे. त्यामुळे येत्या रामनवमीला माध्यामांनी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

'1 दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात'

'मागील 15 महिने सातत्याने कोरोना विषयी बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली, असे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे. तसेच केवळ या नकारात्मकतेमुळे अनेक लोकांनी काहीही कारण नसताना आत्महत्या देखील केल्या आहे. त्यामुळे माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की येत्या रामनवमीला केवळ एक दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात. जेणेकरून लोकांची मानसिकता बदलण्यास मदत होईल', असे ट्विट नांदगावकर यांनी केले आहे. मागील वर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊन अनेक महिने वाढला होता. लोकांचे नैराश्य दूर व्हावे आणि मनोरंजनासाठी महाभारत, रामायण हा कार्यक्रम पुन्हा प्रदर्शित केला होता. या कार्यक्रमाने टेलिविजन क्षेत्रातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच ट्वीट
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच ट्वीट

लॉकडाऊननंतरही परिस्थिती हाताबाहेर

संचारबंदी लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून, या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात किराणा दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला होता.

हेही वाचा - नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.