ETV Bharat / city

RTE Admissions : आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद; राज्यात अद्यापही 'इतक्या' जागा रिक्त - आरटीई प्रवेशाला महाराष्ट्रात अल्प प्रतिसाद

बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये काही जागा राखीव ठेण्यात येतात. मात्र, या जागांसाठी यंदा अल्प प्रतिसाद दिसून येत ( Short Response In Maharashtra RTE Admission ) आहे.

RTE Admissions
RTE Admissions
author img

By

Published : Apr 17, 2022, 5:27 PM IST

मुंबई - बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला यंदा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षांकरिता आरटीई प्रवेशाच्या एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ तीन दिवस उरले असताना आतापर्यंत फक्त १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले ( Short Response In Maharashtra RTE Admission ) आहे.

८७ हजार ३०२ जागा रिक्त - बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष याकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांमध्ये १,०१,९०६ जागा आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील केवळ १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला असून, अजूनही ८७ हजार ३०२ जागा रिक्त आहेत. सुट्या आल्याने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी लागणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती आले अर्ज? - अहमदनगर ६९२३, अकोला ६००३, अमरावती ८०११, औरंगाबाद १७२२१, भंडारा २६०८, बीड ४९५२, बुलढाणा ४७८६, चंद्रपूर ३८९५, धुळे २६६६, गडचिरोली ७६३, गोंदिया २८७९, हिंगोली १८०५, जळगाव ८३५४, जालना ५१७३, कोल्हापूर ३४४९, लातूर ५०५१, मुंबई १५०५०, नागपूर ३१४११, नांदेड ७५९१, नंदुरबार ७८८, नाशिक १६५६७, उस्मानाबाद १६९६, पालघर २७४१, परभणी २३९२, पुणे ६२९६०, रायगड ८७७८, रत्नागिरी १०३८, सांगली २२४६, सातारा ३२६१, सिंधुदुर्ग १९३, सोलापूर ५२२३, ठाणे २५४१९, वर्धा ३९१४, वाशीम १७६१ आणि यवतमाळ ५१४५, असे आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून २ लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले आहे.

पुण्यात सर्वाधिक अर्ज - आरटीई प्रवेशाला दर वर्षी पुण्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या २०२२-२३ शैक्षणिक वर्षांमध्ये सुद्धा आरटीई प्रवेशाला चांगला प्रतिसादात मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत पुणे जिल्हातील ९५७ शाळांमध्ये १५ हजार १२६ आरटीईच्या जागाकरिता ६२ हजार ९६० अर्ज केले आहेत. १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील २ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला आहे.

हेही वाचा - Shivsena Agitation At Navneet Rana House: नवनीत राणांच्या घरासमोर शिवसेनेचे आंदोलन, शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.