मुंबई - महानगरपालिका प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या धर्तीवर अपघाती विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी या योजनेला थंडा प्रतिसाद दिल्याचे उघडकीस आले आहेत. गेल्या दोन वर्षात पालिकेतील एक लाख कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४० हजार कर्मचाऱ्यांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. कर्मचाऱ्यांचा मिळणारा थंडा प्रतिसाद पाहता प्रशासनाने, कर्मचाऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा... सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याचा प्रचार खोटा; नागपुरात गुन्हा दाखल
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी खर्चात अपघात विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाच्या 'समूह वैयक्तिक अपघात विमा योजने'मध्ये सहभागी होण्याची संधी महापालिकेने कर्मचाऱ्यांना २०१८ पासून उपलब्ध करुन दिली. या अंतर्गत वर्षाला केवळ ३५४ रुपयांत तब्बल १० लाखांचे अपघात विमा संरक्षण प्राप्त होते. मात्र, गेल्या २ वर्षात १ लाख २ हजार २१३ मनपा कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४० हजार ३४९ कर्मचाऱ्यांनी या योजनेत नाव नोंदणी केली आहे. तर निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अजूनही या योजनेत नाव नोंदणी केली नाही. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : झारखंडमधील नगर परिषदेने सुरू केली 'भांड्यांची बँक'!
गेल्या वर्षी दुर्दैवाने दोन महापालिका कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. परंतु, त्यांनी त्यांच्या पगारातून ३५४ रुपये कापण्यास संमती दिलेली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना या १० लाख रुपयांच्या अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला नाही. तर दरवर्षी मार्च महिन्यात मिळणाऱ्या पगारातून ३५४ रुपये कापण्यास संमती देणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अपघाती मृत्यू झालेल्या दोन कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या योजनेअंतर्गत १० लाखांच्या मदतीसाठी पात्र ठरले. शिवाय अपघातामुळे अपंगत्व आलेला एक कर्मचारी पाच लाख रुपये मदतीसाठी पात्र ठरला.
हेही वाचा... अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कोणत्याही वेळी काहीही होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील जबाबदाऱ्यांच्या दृष्टीने कुटुंबीयांना आर्थिक मदत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेत सहभागी होण्याची संधी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी या समूह विमा योजनेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या सामान्य प्रशासन खात्याद्वारे करण्यात आले.