मुंबई - शहरात एका डिलिव्हरी बॉयने अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने चारकोप परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पीडितेच्या पालकांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मुंबईतील एका इमारतीजवळ डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. तिथे एक 6 वर्षांची मुलगी एकटी खेळत होती. डिलिव्हरी बॉयने तिला पत्ता विचारला. त्यानंतर तो मुलीला तिथे घेऊन गेला. तिथे त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. आपल्या सोबत झालेले कृत्य सर्व मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी संतापलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला व तत्काळ कारवाई करत आपली सुत्रे फिरवून त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी घडले होते साकीनाका बलात्कार प्रकरण -
साकीनाका येथील 32 वर्षीय महिलेवर अमानुष्य कृत्य करण्यात आले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती. मुंबईत साकीनाका येथील खैराणी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले होते. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या महिलेचा मृत्यू झाला आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने पीडित महिला वाचू शकली नाही. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.
हेही वाचा - Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी