मुंबई - भाजपच्या रुपाने शिवसेनेवर असलेलेच नाही तर राज्यावर असलेले ओझेही उतरले असल्याची बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतर बुधवारी या बातमीचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना सिनेमाचा उल्लेख केला होता. त्यात उद्धव ठाकरे, 'सामना सिनेमात एक गाणे आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. आम्हीही ३० वर्षे ओझे उचलत होतो ते आता उतरवले आहे.' असे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत सामना संपादकीयतून भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'
शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. भाजपच्या रुपाने शिवसेनेवर असलेलेच नाही तर राज्यावर असलेले ओझे उतरले अशीही टीका शिवसेनेने केली आहे.
हेही वाचा... जनआक्रोश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात धगधगताहेत 'ही' शहरं
भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ओझे व ताण इतका उतरला की, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. खडसे यांना आता इतके मोकळे वाटू लागले आहे की, ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. माझा निर्णय घ्यायला मी मोकळा असल्याचे ते हिमतीने सांगतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे.
हेही वाचा... फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?
भाजप म्हणजे ‘भारत जलाओ पार्टी’ आहे अशी बोंब ज्यांनी ठोकली होती ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मोदी यांना खालच्या शब्दात टोले मारणारे नितीशकुमार हे बिहारात भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे? भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत.
हेही वाचा.... फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?
काँग्रेस पक्षातून टनावारी माणसे फोडून आपल्या पक्षात घ्यायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले वगैरे अशी वक्तव्ये करण्याच्या भानगडीत पडू नये. देवेंद्र फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना सामनातून टोला लगावण्यात आला आहे.