मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतरही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला.
हेही वाचा... भारतामध्ये मोदी-शाह यांच्या रुपात नाझी शासन, रणदीप सुरजेवाला यांची टीका
कृष्णकुंज येथे कार्यकर्त्यांचा मनसेत पक्षप्रवेश
राज्यातील वेगवेगळ्या विभागातील शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मनसेचा झेंडा हाती घेतला. यामध्ये रायगडमधील पेण, मुरुड, अलिबाग भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच केज, बीडमधील शिक्षकांनीसुध्दा पक्षात जाहीर प्रवेश केला. राज ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर, मनसे दादर विभागाच्या वतीने गरजू मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा... जेएनयू हिंसाचार : ही फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक - ममता बॅनर्जी
स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारे दुर्लक्ष, यांसारख्या कारणांमुळे सेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रकारची खदखद होती. अखेर ती या पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली.