ETV Bharat / city

Sanjay Raut On Pen Drive Case : 'पेनड्राईव्ह यांच्या घरात जन्माला येतात का?' राऊतांचा फडणवीसांना टोला - संजय राऊत पेन ड्राईव्ह केस बातमी

देवेंद्र फडणवीसांनी दोन पेनड्राईव्ह बॉम्ब ( Devendra Fadnavis Pen Drive Case ) टाकत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. पेनड्राईव्ह यांच्या घरात जन्माला येतात का?, असा सवाल त्यांनी केला ( Sanjay Raut On Pen Drive Case ) आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Mar 25, 2022, 7:13 PM IST

मुंबई - राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्हच्या ( Devendra Fadnavis Pen Drive Case ) माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यात गुरुवारी फडणवीसांनी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. त्यावर आता पेनड्राईव्ह यांच्या घरात जन्माला येतात का?, असा सवाल विचारत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला ( Sanjay Raut On Pen Drive Case ) आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची हात मिळवणी चालू आहे. महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही. खोट्या प्रकरणातून हे सरकार उध्वस्त करायचे असा हा कट आहे. हे लोक परस्पर आरोप पत्र तयार करतात आम्हालाच माहीत नसते आमच्यावर कोणते आरोप आहेत."

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

तुमचा महाराष्ट्रद्रोही आत्मा शांत करा

"तुमचा महाराष्ट्रद्रोही आत्मा शांत करा. ज्यांना तुरुंगात टाकायचे ती यादी तयार करा आणि सांगा या 25 लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टाका मग आमच्यावर आरोप करा काही हरकत नाही. घाणेरड्या पद्धतीच्या या कारवाया चालू आहेत. महाराष्ट्रात नीच आणि इतका हलकट पातळीचे राजकारण कधीही झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का ?" असा सवालही राऊत यांनी केला आहे.

पेनड्राईव्ह यांच्या घरी बाळंत होतात का ?

"त्यांच्या घरात रोज पेन ड्राइव बाळंत होतात का ? बघावे लागेल. हा पेनड्राईव्ह तो पेनड्राईव्ह आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू आणि तो या सर्वांना भारी पडेल. रोज एक खोट प्रकरण तयार करता कसे छान आहे. रोज नवीन बाळंतपण जमते काय माहिती," असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

हेही वाचा - प्रताप सरनाइक यांची 11 करोडची संपत्ती ईडी ने केली जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.