मुंबई- बंडखोरांचं महाराष्ट्रात काहीच काम नाही, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut latest news ) यांनी केली. बंडखोरांच्या नातेवाईकांशी आमचा संपर्क असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut on Eknath Shindes rebel ) म्हणाले, की जे आमच्या संपर्कात आहेत त्यांना आम्ही बंडखोर समजत नाही. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क आहे. कालपासून त्यांच्यात पुन्हा चलबिचल आहे. राज्यपालांचा कोरोना बरा झाला झाला. त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी 12 आमदारांची फाईल क्लिअर करावी. फडणवीस यांच्याकडे आमदारांचं मोठं बळ आहे. विकास करण्याची, फडणवीस यांची क्षमता आहे. मात्र सध्याच्या या डबक्यात त्यांनी उतरू नये. शिंदे गटाचे नाव न घेता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला डबके म्हटले आहे.
ईडीची चौकशी करण्याची संजय राऊत यांनी नोटीस बजाविली आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की ज्या क्षणी मी मोकळा असेल तेव्हा मी जाऊन चौकशीला समोर जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. उद्धव साहेब यांना गुहावटीमध्ये बसून सल्ले देऊ नका, असेही त्यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे.