ETV Bharat / city

शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण खाते सांभाळतात - राऊत - cabinet expansion modi

शिक्षणाचा संबंध नसलेल्या लोकांना शिक्षण मंत्री बनवण्यात येते, अशी टीका त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केली.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Jul 8, 2021, 3:08 PM IST

Updated : Jul 8, 2021, 3:18 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळात फेरबदल आणि विस्तार (cabinet expansion modi) करण्यात आला आहे. या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. शिक्षणाचा संबंध नसलेल्या लोकांना शिक्षण मंत्री बनवण्यात येते, अशी टीका त्यांनी नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यावर केली. विक्रोळी येथील पालिकेच्या सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल दरवाढीचे खापर फोडले जागतिक बाजारावर!

जुन्या आठवणी सांगितल्या

ते पुढे म्हणाले, की गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मला विचारले, की आप कौन से स्कूल में पढते हो, त्यावेळी म्युनिसीपालिटी स्कूल नंबर फाइव्ह, पंतनगर मी त्यांना सांगितले. पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेच्या उद्घाटनसमारंभी संजय राऊत यांनी जुनी आठवण सांगितली. तसेच यावेळी त्यांनी नव्या शिक्षण मंत्र्यांवर टीकादेखील केली आहे.

हेही वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील चेहरे ही शिवसेना-राष्ट्रवादीची देण - संजय राऊत

'प्रधान पेट्रोल विकत होते'

या देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचे नाव आहे धर्मेंद्र प्रधान. मी त्यांना ओळखत होतो कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. ते पेट्रोलियम मिनिस्टर होते. याआधी रमेश पोखरीयाल (Ramesh Pokhriyal) होते ते शाळेतच फार गेले नव्हते, पण ते देशाचे शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळाले, की त्यांना काही येत नाही. त्याच्या आधी स्मृती इराणी (Smriti Irani) मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर टीका केली.

Last Updated : Jul 8, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.