मुंबई - सध्या केंद्र सरकार महाराष्ट्राला, राज्य सरकारला बदनाम करणाऱ्या ३६ लोकांना झेड प्लस सुरक्षा देत आहे. यातून केंद्र सरकार त्यांचा सन्मान करत आहे. मात्र, झेड प्लस सुरक्षा पुरवली म्हणजे चौकशी होणार नाही असे नाही. समीर वानखेडे यांची चौकशी नक्की होणार असे असे राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता मी पुढची कथा सांगेन - संजय राऊत
'ही सुरक्षा जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवा'
समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार, अशी चर्चा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत बोलत होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून सुरू झालेल्या वेगळेच वळण घेतले आहे. एन. सी. बी. अधिकरी समीर वानखेडेविरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद रंगला आहे. दररोज नवीन नवीन आरोप-प्रत्यारोप नवाब मलिक आणि वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात येत आहेत. त्यावर राऊत बोलत होते. ही सुरक्षा त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
'अशांचा केंद्राकडून सन्मान'
महाराष्ट्राच्या राज्य सरकारवर जो आरोप करतो, बदनाम करतो त्याला झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते. अशा लोकांचा केंद्र सन्मान करत आहे. महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य आहे. इथे सर्व लोक सुरक्षित आहेत. जर एखाद्या अशा व्यक्तीला सुरक्षा मिळत असेल तर केंद्राकडे खूप सुरक्षा आहे, असे दिसते. त्यांना काम नसेल तर ही सुरक्षा त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप
'रडीचा डाव बंद करा'
महाराष्ट्र सरकारची केंद्राने बदनामी थांबवावी अशी आमची इच्छा आहे. कोणी कितीही काही म्हटले तरी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला धोका नाही. हा रडीचा डाव त्यांनी बंद केला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.
'सर्वोच्च न्यायालयाचा आभारी'
सरकारमधील २ केंद्रीय मंत्री, राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, खासदार यांचे फोन इस्राइलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून ऐकले जात होते. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी समिती स्थापन करून तपासाचा निर्णय घेतला आहे. हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असेही राऊत म्हणाले.