ETV Bharat / city

Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे - माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Interview : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला आहे.

Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray Interview
author img

By

Published : Jul 26, 2022, 9:21 AM IST

Updated : Jul 26, 2022, 10:47 AM IST

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीमधील (Uddhav Thackeray Interview) आज पहिला भाग प्रसारीत करण्यात आला आहे. या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्यांवर भाष्य केले आहे.

Uddhav Thackeray Interview

सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या- मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाही, असंही सांगण्यात आलं.

भाजपने हे आधीच केलं असतं तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं- उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजपवर जोरदार निशाणा साधला. "2019 च्या बोलणीप्रमाणे भाजपने आता केलं आहे. हे आधीच केलं असतं तर देशभर पर्यटनाची गरज पडली नसती. हजारो कोटीचा खर्च करण्याची वेळ आली नसती. आधी केलं असतं तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं.

होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला - भाजपने शब्द पाळला असता, तर महाविकास आघाडीचा जन्मली नसती. लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील. ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रात काम करत आहे. घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

पानगळ झाली पालापाचोळा उडत - हिंदूद्वेषी घरातच आता हे कपाळ करंटे आहेत. हा पालापाचोळा आज उडत आहे. जी पाने गळणे गरजेचे आहेत, ती गळत आहेत. पानगळ होते, तेव्हा आपल्याला वाटते की, झाडाला काय झाले ? झाडाकडून सर्व काही मिळाल्यानंतर पाने टवटवीत झाले आणि गळून पडत आहेत, असा घणाघात भाजप आणि शिंदे गटावर केला. परंतु, 8-10 दिवसानंतर झाडाला कोंब फुटून झाड हिरवेगार होते. ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटत असून संघर्ष काय आहे. हे त्यांना कळाल आहे. ते आशीर्वाद देत आहेत. विश्वास घातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, याबद्दल मला आता चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, हे माझं भाग्य आहे. असे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येत आणि ते माझ्या नशिबी आले, असेही ठाकरे यांनी सांगितले.

घराबाहेर पडण्याचा तो काळच तसा होता - महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का ? असा प्रश्न राऊत यांनी ठाकरेंना विचारला असता, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता. पण तसं झालं नाही. जनता आनंदी होती. सत्तेवर येतात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. कोरोना काळात संपूर्ण मंत्रिमंडळाने प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केले. म्हणूनच पहिला 5 मुख्यमंत्र्यांमध्ये नाव आले असले, तरी ते मी माझं नाव मानत नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होते. जर यांनी सहकार्य केलं नसतं, तर मी काय एकटा करणार होतो. असे सांगत जनतेचे ऋण व्यक्त केले. तसेच घरातून बाहेर पडत नाही, यावर टीका करणाऱ्या शिंदे गटासह विरोधकांनाही प्रत्युत्तर देताना, तो काळ असा होता की घराबाहेर पडायचं नाही. हे मी लोकांना सांगत होतो. त्यामुळेच मी घराबाहेर पडलो नाही. घराबाहेर पडलो असतो तर शिवसेनाप्रमुखांच्या, पूर्वजांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच. मग लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं झाले असते. त्यामुळे घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये काम करता येत हे दाखवून दिले, अशा शब्दांत सुनावले.

गुंगीत असताना हालचाली - मी गुंगीत असताना माझे सरकार पाडले जात होते. तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया कुठल्याही डॉक्टरांना विचारल्यानंतर मानेचे गंभीर धोके असतात. अचानक पाच-सहा दिवसानंतर सकाळी जाग आली आळस देताना मानेच्या हालचाल बंद झाली. तो गोल्डन आवर होता. यातच माझे ऑपरेशन झाले, म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मी बरा व्हावा म्हणून काही जण देवाची पूजा करत होत, तर मी असाच असावा यासाठी काहीजण चिंतित होते. ही गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणीत राहील. जेव्हा माझी हालचाल बंद होत होती, तेव्हा काहीजण हालचाली वाढवत होते अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

सामान्यांमधून असामान्य बनवण्याची वेळ - बाळासाहेबांचे नाव भाजप आणि शिंदे गट घेतात. त्यांचे नाव पुढे करून समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत. मला देशाच्या घटनेवर विश्वास आहे. चोरीमारी सर्वत्र चालते. पण सत्यमेव जयते मी मानतो. आज सत्यमेव जयते हा शब्द भाजपचे ब्रीद असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आज मंत्री जरी झाले तरी त्यांच्या कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं. ही शिवसेनेची ताकद आहे. पुन्हा एकदा सामान्यांमधून असामान्य घडवण्याची वेळ आहे. त्यामुळे माझ्या तमाम शिवसैनिक माता भगिनींना पुन्हा उठा आणि सामान्य असामान्य बनवूया असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा - Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांचा पराक्रम

हेही वाचा - Kargil Vijay Diwas 2022 : कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला कसे तोंडघशी पाडले, जाणून घ्या...

Last Updated : Jul 26, 2022, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.