मुंबई - शिवाजी पार्क मैदानात रस्त्याचे काम सुरु ( Shivaji Park Road Work Controversy ) आहे. मात्र, या कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत नागरिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर ( Shivaji Park Citizens Meet Raj Thackeray ) गेले. त्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्कवर पाहणी केली आहे.
शिवाजी पार्क मैदानामध्ये काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत मैदानाच्या मधोमध खडी टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पार्कमधून रस्ता बनणार असल्याची शंका स्थानिक रहिवाशांना, खेळाडूंना आणि क्लब सदस्यांना वाटू लागल्याने त्यांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्कवर पाहणी केली आहे.
काय सुरु आहे काम?
शिवाजी पार्क मैदानात मधोमध खडीवर मातीचा थर टाकण्यात येणार आहे. हा रस्ता मातीचा त्या खाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रॅव्हल्स टाकण्यात येत आहे. ग्रॅव्हल्स टाकल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतले'