ETV Bharat / city

Shiv Sena Vs Election Commission : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचा ठोठावणार दरवाजा - शिवसेना धनुष्य बाण पक्षचिन्ह

आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना होऊ ( Shivsena on Shinde Camp ) शकत नाही. पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचे आहेत. बंडखोरांना हक्क सांगण्याचे अधिकार नाहीत, अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते. मात्र निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत शिवसेना कोणाची या संदर्भातील कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Shivsena
शिवसेना
author img

By

Published : Jul 25, 2022, 9:01 AM IST

Updated : Jul 25, 2022, 10:09 AM IST

मुंबई - शिवसेना कोणाची यासंदर्भात कागदपत्र सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने ( Shiv Sena Vs Election Commission ) दिले आहेत. या विरोधात शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. शिंदे गटविरोधात अनेक न्यायप्रविष्ठ असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशावर शिवसेनेचा ( Shiv Sena Supreme court ) आक्षेप आहे.

शिवसेनेच्या बंडखोर चाळीस आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. विधिमंडळातील गटनेते आणि प्रवक्ते पदावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेश डावलून नियुक्ती केली. तसेच पक्षाविरोधी कारवाया केल्या, असा ठपका ठेवत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. १ ऑगस्टला या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र, त्या आधीच शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दोन तृतीयांश आमदार, खासदार आहेत. शिवसेना पक्षाला गटाची मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आधीच लढाई सुरू असताना शिंदे गटाने पत्र देऊन शिवसेनेची अडचण वाढवली आहे.

बंडखोरांना हक्क सांगण्याचे अधिकार नाहीत- उद्धव ठाकरे- आमदार आणि खासदार म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचे आहेत. बंडखोरांना हक्क सांगण्याचे अधिकार नाहीत, अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते. मात्र निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत शिवसेना कोणाची या संदर्भातील कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण आधीच न्यायालयात प्रलंबित आहे. अद्याप यावर अंतिम सुनावणी झालेली नाही. अशातच निवडणूक आयोगाने पत्र पाठवल्याने शिवसेनेने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती द्यावी अशी मागणी करणार आहे. शिवसेनेच्या या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.

हा फरक शिवसेना आणि भाजपमध्येशिवसेना हिंदुत्वासाठी जगते. मात्र, भाजपा राजकारणाकरिता हिंदुत्व वापरते. हा फरक शिवसेना आणि भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे. मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित ( uddhav thackeray attacked shivsena rebel mla ) होते.

'तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या...' - शिंदे गटातील बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं आहे. 'त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या फोटेने मतं मागावती. हिंम्मत असेल तर माझ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो न लावता तुम्ही मत मागा. तुम्हाला माझ्या आई-वडिलांच्या फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही,' अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

'तुम्ही तयार राहा' - गेलेल्या बंडखोरांना काय म्हणाले अशी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'ही मंडळी दरोडेखोर आहेत. ते शिवसेना संपवायला निघालेत. त्यांचं शिवसेना संपवायचं मोठं कारस्थानं आहे. त्याला उत्तर द्यावे लागणार. गट प्रमुखांचे प्रतिज्ञापत्र, कायदेशीर संघर्षासाठी लागणार आहे. तुम्ही तयार राहा. तुमच्या दोन्ही हातांमध्ये सदस्यांचे अर्जाचे गठ्ठे असायला हवे. फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांचे अर्जाचे पदाधिकारी यांचे शपथपत्र हवे,' असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.

हेही वाचा-Maharashtra Breaking News : एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) सुधारित परिक्षा 2023 पासून लागू होणार

हेही वाचा-MBBS Admission Scam : कोल्हापुरातील एससीएसईएस संस्थेत एमबीबीएस प्रवेश घोटाळा, 350 विद्यार्थ्यांची 65 कोटींची फसवणूक

हेही वाचा-Sunil Kedar on Farmers issue : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी : माजी मंत्री सुनील केदार

Last Updated : Jul 25, 2022, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.