ETV Bharat / city

Saamna Criticize on Shinde Government बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार सामनातून सरकारवर टीकास्त्र - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तांतर होऊन अखेर शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेनंतर 40 दिवसांनंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु अजूनही खातेवाटप व पालकमंत्री वाटपावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पावसाळी अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेले असतानासुद्धा खातेवाटप न झाल्याने सरकारच्या एकंदरीत या भोंगळ कारभारावर शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे. Saamna Criticize on Shinde Government

Saamna Criticize on Shinde Government
सामनातून सरकारवर टीकास्त्र
author img

By

Published : Aug 13, 2022, 11:03 AM IST

मुंबई राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस ( Shinde-Fadnavis Government ) ( Deputy CM Devendra Fadnavis ) सरकार ३० जून रोजी अस्तित्वात आले. त्यानंतर ४० दिवसांनंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ( Cabinet Expantion ) झाला. परंतु, अजूनही खातेवाटप व पालकमंत्री वाटपावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, पावसाळी अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेले असतानासुद्धा खातेवाटप न झाल्याने सरकारच्या एकंदरीत या कारभारावर शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनातून टीका ( Saamna Criticize on Shinde Government ) करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी शिंदे फडवणी सरकार बिनमंत्र्यांचे होते. ४० दिवसानंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या नाकीनऊ अशा एकूण १८ मंत्रांनी शपथ घेतली. मात्र, त्याला तीन दिवस उलटले, तरी अद्याप खाते वाटपाचे बारसे होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार संधी साधूंचे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली ते साधू बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलाईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे नामुष्की सरकार सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. काय म्हटले आहे सामनामधून पाहुया

पाळणा हलला, पण पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळना 40 दिवसानंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे. पण, राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे, ना जिल्हा जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले आता त्यातील खाते वाटपासाठीसुद्धा घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे? असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दौऱ्या आहेत आणि त्या आतल्या बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहे ते त्यांना हवे असलेल्या खात्यांसाठी तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीला झटका देत आहेत.

धोका देणाऱ्यांचे राज्य शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दोन दिवसांपूर्वी असा झटका दिला होता. बच्चू कडू हे ज्येष्ठ अपक्ष आमदार आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होते. मात्र, शिंदे गटाने बंडखोरी केली तेव्हा त्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांत ते अग्रेसर राहिले. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या पाळण्यात आपल्यालाही जागा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आणि आपल्या या नाराजीचे अत्यंत कडू शब्दांत त्यांनी विद्यमान सत्याधारांना डोस पाजले.

बच्चू कडू यांनी कडू शब्दांचे डोस पाजले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ( Bachu Kadu met the Chief Minister ) त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसविले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसविले आहे. अशा शब्दांत त्यांनी विद्यमान सरकारवर निशाणा साधला. पुन्हा त्यांनी या सरकारचे जाहीर बारसे करून टाकले आहे. धोका देणाऱ्यांचे राज्य, असे नामकरण त्यांनी या सरकारला केले आहे. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार अशा शब्दात बच्चू यांनी शिंदे- फडणवीस सरकारचे कडू सत्य पुन्हा चव्हाट्यावर आणले.

दोघांचेही दुसरे नाव विश्वासघात, धोका हेच आहे
अर्थात त्यात नवीन काय आहे. शिंदे गट काय किंवा त्यांना मांडीवर घेणारा भाजप काय. दोघांचेही दुसरे नाव विश्वासघात, धोका हेच आहे. शब्द द्यायचा आणि नंतर फिरवायचा ही तर भाजपची रीतच आहे आणि त्याचा प्रत्यय 2019 मध्ये महाराष्ट्राला आलाच आहे. त्याआधीही 2014 मध्ये शेवटच्या क्षणी त्यांनी विश्वासघात केलाच होता. शिंदे गटाने तरी दुसरे काय केले आहे. त्यांचा मुखवटा हिंदुत्व वगैरेचा असला तरी मूळ चेहरा विश्वासघात आणि धोकेबाजीचाच आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून बनविलेले सरकार धोका देणार आहे. बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचा पाळणा हलला असता तर त्यांना या धोक्याचा साक्षात्कार कदाचित झाला नसता. पण तसे झाले नाही आणि शिंदे फडणवीस सरकारचे कडू सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.

अनेक दुःखी आणि सुप्त ज्वालामुखी शिंदे फडणवीस सरकारमध्ये अनेक दुःखी आणि सुप्त ज्वालामुखी शिंदे फडणवीस सरकारमध्ये आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्यापही खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकारच अशा अनेक सुप्त ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. त्यापैकी कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिला आहे. शिवाय ज्या मुद्द्यांसाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले आहे, ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे गुद्देही सरकारला लगावले आहेत.

हेही वाचा Ashok Chavan React on Pankaja Munde Upset अशोक चव्हाण म्हणाले किमान पंकजा मुंडेंचे तरी नीट ऐकावे, ही अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.