मुंबई - माजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सामना लवकरच रंगणार आहे. त्याबाबतची माहिती संजय राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड पुकारल्यानंतर संजय राऊत हे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले संजय राऊत - संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये जोरदार मुलाखत, सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे, महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत असे लिहिले आहे. ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला होणार असल्याचेही आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
-
जोरदार मुलाखत..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..
महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली
मुलाखत..
सामना..26 आणि 27 जुलै. pic.twitter.com/U9pVYspDxE
">जोरदार मुलाखत..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..
महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली
मुलाखत..
सामना..26 आणि 27 जुलै. pic.twitter.com/U9pVYspDxEजोरदार मुलाखत..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..
महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली
मुलाखत..
सामना..26 आणि 27 जुलै. pic.twitter.com/U9pVYspDxE
वही दुनिया बदलते है . . . - आदित्य ठाकरे 22 जुलैपासून शिवसंवाद यात्रेवर निघाले आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा नाशिकवरुन वैजापुरात पोहोचली. त्यानंतर आज त्यांनी औरंगाबादेतील पैठणसह, विविध परिसरात या संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा रोडशोमधील फोटो ट्विट केला. त्यावर जिगर मुरादाबादी यांचा जो तुफानोंमे पलते जा रहे हैं.. वही दुनिया बदलते जा रहे हैं! हा शेर पोस्ट केला. मात्र हा फोटो ट्विट केल्यानंतर संजय राऊत यांना अनेक युजरनी ट्रोल केले.
-
जो तुफानोंमे पलते जा रहे हैं..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
वही दुनिया बदलते जा रहे हैं!
_ जिगर मुरादाबादीं.@AUThackeray @BJP4Maharashtra @RahulGandhi @priyankagandhi @mieknathshinde @IpsaShatakshi
@MamataOfficial @supriya_sule@OfficeofUT @AUThackeray @kanhaiyakumar @ArvindKejriwal pic.twitter.com/jBTxTDSlBP
">जो तुफानोंमे पलते जा रहे हैं..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
वही दुनिया बदलते जा रहे हैं!
_ जिगर मुरादाबादीं.@AUThackeray @BJP4Maharashtra @RahulGandhi @priyankagandhi @mieknathshinde @IpsaShatakshi
@MamataOfficial @supriya_sule@OfficeofUT @AUThackeray @kanhaiyakumar @ArvindKejriwal pic.twitter.com/jBTxTDSlBPजो तुफानोंमे पलते जा रहे हैं..
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
वही दुनिया बदलते जा रहे हैं!
_ जिगर मुरादाबादीं.@AUThackeray @BJP4Maharashtra @RahulGandhi @priyankagandhi @mieknathshinde @IpsaShatakshi
@MamataOfficial @supriya_sule@OfficeofUT @AUThackeray @kanhaiyakumar @ArvindKejriwal pic.twitter.com/jBTxTDSlBP
शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसारित होणार मुलाखत - संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ही शिवसेनेच्या मुखपत्रातून 26 आणि 27 जुलैला प्रसारित केली जाणार आहे. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रात संपादक असलेल्या संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुखाची मुलाखत घेतल्याने सोशल मीडियातून यावर चांगलीच टीका होत आहे.