ETV Bharat / city

मातोश्रीवर शिवसेनेची बैठक संपन्न... आमदारांना 'रंग शारदा' येथे एकत्र राहण्याचे आदेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि प्रमुख नेत्यांची मुंबईतील मातोश्री बंगल्यावरील बैठक संपन्न... बैठकीनंतर सर्व आमदार रंग शारदा सभागृह येथे जाणार... युतीबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे...

मातोश्रीवर शिवसेनेची बैठक संपन्न
author img

By

Published : Nov 7, 2019, 12:39 PM IST

Updated : Nov 7, 2019, 4:59 PM IST

मुंबई - भाजपचे प्रमुख नेते गुरूवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि नवनिर्वाचित आमदारांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर बैठक पार पडली. यानंतर आमदार आणि सर्व नेते यांना एकजुटीने राहण्याचा आदेश पक्षप्रमुखांनी दिला असून, आमदारांची रवानगी 'रंग शारदा' येथे होणार आहे. तसेच युतीबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे देण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले आहे.

  • Sanjay Raut, Shiv Sena: We have the numbers to make our own Chief Minister, we don't need to show that here, we will show that on the floor of the house. We have alternatives, we don't speak without options and alternatives. #Maharashtra pic.twitter.com/IPqf3BiCex

    — ANI (@ANI) November 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे तरुण आमदार सरसावले; सोनिया गांधींची आज घेणार भेट

राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून होत असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सध्या जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. गुरूवारी मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची सुरक्षेसाठी हॉटेल ट्रायडंट येथे रवानगी होणार होती, मात्र आता रंग शारदा येथे आमदारांना जाण्यास सांगितल्याचे समजत आहे. तर मुंबईमधील आमदारांनाच फक्त घरी जाण्याची परवानगी आहे.

हेही वाचा... शिवसेना आमदारांची आज बैठक; त्यानंतर हॉटेलमध्ये होणार रवानगी

3 PM : शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार यांची परिषद

शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमच्याकडे पर्याय उपलब्ध असून आम्ही पर्याय असल्याशिवाय बोलत नसल्याचे म्हटले. तसेच जनतेने महायुतीला जनादेश दिलेला आहे. एकट्या भाजपला नाही. तसेच भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांनी आधी राज्यापालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा. त्यांनी १४५ आमदारांचे बहुमत सिद्ध करून दाखवावे. यापूर्वी देखील त्यांनी अल्प मतातले सरकार आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे संजय राऊत म्हणाले.

आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रीया

उद्धव ठाकरेंनी सांगितले तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबतही जाणार - अब्दुल सत्तार

  • शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे असेल. उद्धव ठाकरे यांनी जर सांगितले तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबतही जाणार, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. भाजपने शब्द दिल्याप्रमाणे अडीच अडीच वर्ष मान्य न केल्यास 5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा... शिवसेना आमदारांची ठाम भुमिका.

पक्षाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी गुरूवारी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आमदारांनी साहेब आता तडजोड करू नका, मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा असे सांगितले आहे.

आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रीया
  • मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

  • मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व आमदार आणी प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर, दुपारी 3 वाजता सामना कार्यालयात शिवसेना नेत संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे.

मातोश्रीवरील बैठकीनंतर आमदारांच्या प्रतिक्रीया ;

  • मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा
  • फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत
  • सर्व आमदारांचा एकच सूर मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार - अब्दुल सत्तार
  • भाजपने मान्य न केल्यास 5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री
  • आम्ही सर्व आमदार शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार
  • 64 आमदार रंगशारदा येथे उध्दव ठाकरेंच आदेश येईपर्यंत राहणार
    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीतीत शिवसेना नेते आणि आमदारांची मातोश्रीवर बैठक सुरू

मातोश्रीवरील बैठकीतील संभाव्य मुद्दे ;

  • सर्व आमदारांना एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली जाणार
  • राज्यात ज्या ज्या भागात युतीची सत्ता आहे, तेथील शिवसेनेच्या ताकदीचा आढावा घेतला जाणार
  • युती आणि राज्यातीस सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता

Last Updated : Nov 7, 2019, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.