मुंबई - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या भूमीकेवर प्रश्न उपस्थित करावेत सुरुवातीला सुरत आणि आता आसाम मध्ये बंड पुकारला आहे. मात्र जे गेले ते बंडखोर होते. ओरिजनल शिवसैनिक येथे आहे, अशा टोला विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार ओमशा पाडवी यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला.
आमशा पाडवी बैठकीला हजर - विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याविरोधात भूमिका घेत बंड पुकारला आहे. सुमारे 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. तसेच पक्षविरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. विशेषतः शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे. सध्या हा वाद शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक घेतली. समिती सदस्य, नेते, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमदार आमशा पाडवी देखील बैठकीला हजर होते.
शिवसैनिक कुठेच जात नाही - जे पळून गेले ते बंडखोर आमदार होते. ओरिजिनल शिवसेना इथे आहेत. आमदार पळून जातात, मात्र शिवसैनिक कुठेच जात नाही, असे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले. तसेच बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांच्या बंडाळी मागे भाजपचा हात; मनीषा कायंदे यांची टीका
हेही वाचा - Rebel MLA Dilip Kesarkar Press : दिपक केसरकरांनी सांगितली शिवसेना आमदारांच्या बंडाची खदखदं, पाहा व्हिडिओ