मुंबई मुंबई महानगरपालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता खाली खेचण्यासाठी आता भाजप, शिंदे गटाकडून कसोशीचे प्रयत्न केले जात असल्याचे शिवसेना नेते भास्कर जाधव Shiv Sena Leader Bhaskar Jadhav यांनी सांगितले आहे. व त्या अनुषंगाने चौकशीच्या माध्यमातून आता हा केविलवाणा प्रयत्न शिंदे फडणवीस यांच्याकडून केला जात असल्याचेही त्यांनी Shinde Fadnavis Through Investigation म्हटले आहे. विधानभवनात ते बोलत होते.
मुंबईकरांना शिवसेनाच हवी आहे याप्रसंगी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेने मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या मराठी जनतेची असंख्य कामे केलेली आहे. विशेष करून मुंबई जनतेच्या प्रश्नावर शिवसेना नेहमी धावून गेली आहे. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शिवसेनेने लोकांचे सण साजरे केले. आरोग्यासाठी ॲम्बुलन्ससारखी सेवा शिवसेनेने मुंबईत सुरू केली. रक्तपेढीमधून व स्वतः रक्त देऊन शिवसेना कार्कर्त्यांनी लोकांचे प्राण वाचवले आहेत. मुंबईकरांचे शिवसेनेवर फार मोठ्या प्रमाणात प्रेम Mumbaikars Love Shiv Sena Very Much आहे. आता ही जाणीव भारतीय जनता पक्षाला झालेली आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेतील चौकशीच्या माध्यमातून सत्ता काबिज करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचा धसका युवा नेते आदित्य ठाकरे Youth leader Aditya Thackeray यांच्या संवाद यात्रा व निष्ठा यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद भेटला. जर आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत असेल, तर उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray जेव्हा स्वतः बाहेर पडतील तेव्हा काय होईल, याची भीती त्यांना आहे. त्यामुळे सूडबुद्धीने ही चौकशी लावली आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
केविलवाणा प्रयत्न केला जात आहे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले MLA of Shinde group Bharat Gogawle यांनी सांगितले आहे की, ३ माळ्याची मातोश्री ही बाळासाहेबांची खरी Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray मातोश्री असून, ८ माळ्याची उद्धव ठाकरे यांची मातोश्री चढायला आमचे पाय दुखतात. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मातोश्रीवर तुम्हाला कोणी बोलवले आहे. कोण तिथे तुमच्या स्वागतासाठी बसले आहे. उगाच काहीही बोलायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पन्नास खोकी बरोबर वर्मावर बाण पन्नास खोकी हा शब्दप्रयोग आता लहान शाळकरी मुलांपासून मोठ्यांपर्यंत रुजू झालेला आहे. त्यामुळे आता हे शिंदे गटाचे बंडखोर आमदार अस्वस्थ झाले आहेत. जो बाण आहे तो बरोबर त्यांच्या वर्मी लागला आहे. त्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत. परंतु, जनता हे सर्व बघत आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
हेही वाचा MLA Aditya Thackeray तुमची किव येते, चला मीही राजीनामा देतो, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान