ETV Bharat / city

शिवसेनेचे पुन्हा एकदा 'मिशन राम मंदिर'; 'मंदिर तो हो के रहेगा'चा उद्धव यांचा अयोध्येत नारा

author img

By

Published : Jun 16, 2019, 9:56 AM IST

Updated : Jun 16, 2019, 12:05 PM IST

'पहले मंदिर, फिर सरकार...' अशी घोषणा देत मागील वर्षी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्यावारीसाठी सज्ज झाली आहे.

उद्धव ठाकरे १८ शिलेदारांसह सहकुटुंब अयोध्येत राम लल्लाचे घेणार दर्शन

मुंबई - शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाने ते सहकुटुंब अयोध्येला पोहोचले आहेत. पहाटे मुंबई विमानतळावरून त्यांनी अयोध्येला उड्डाण केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. फैजाबाद विमानतळावर उतरल्यावर त्यांचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनीही गुलाब पुष्प देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा आयोद्धेकडे रवाना झाला.

LIVE :

  • राम मंदिरासाठी आता संसदेतून अध्यादेश काढावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
  • राम मंदिर व्हावे ही सर्व हिंदूंची इच्छा आहे, म्हणूनच पुन्हा एकदा मित्रपक्षांना बहुमताने लोकांनी निवडून दिले आहे.
  • उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मंदिर तो हो के रहेगाचा नारा अयोध्येत दिला.
  • उद्धव ठाकरेंची अयोध्येत पत्रकार परिषद सुरू
  • उद्धव ठाकरेंनी घेतले राम लल्लाचे दर्शन
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत दाखल
    उद्धव ठाकरेंचे पुन्हा एकदा 'मिशन राम मंदिर'

'पहले मंदिर, फिर सरकार...' अशी घोषणा देत मागील वर्षी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्यावारीसाठी सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मतभेद तीव्र झाल्याने शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी उद्धव यांनी प्रथमच अयोध्या दौरा केला होता. 'पहले मंदिर फिर सरकार' ही शिवसेनेची घोषणा त्यावेळी देशभर गाजली. मात्र, मंदिराआधीच केंद्रात सरकार बनले आणि शिवसेना १८ खासदारांसह त्यात सहभागीदेखील झाली. नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला दुय्यम खाते आले आहे.

शिवाय, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागांचे समान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याचे ठरवून भाजपने आपल्या वाट्याला कमी जागा येणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी जागा कमी पडल्यास मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून मित्रपक्षांचा कौल भाजपच्या बाजूनेच राहणार असल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर धर्मसंकट उभे राहिल्यानेच उद्धव यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव यांचा हा अयोध्या दौरा असल्याचेही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

असा असेल उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम -
सकाळी ९:३० वाजता राम जन्म भूमी स्थळावर जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेचे सर्व खासदार दर्शनासाठी उपस्थित रहाणार.
सकाळी १० वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राम जन्मभूमी दर्शनासाठी येणार.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परीषद.

  • सकाळी ११ वाजता हॉटेल पंचशिल (फैजाबाद, अयोध्या हायवे)
  • दुपारी १ वाजता ठाकरे कुटुंब मुंबईसाठी विमानाने निघणार.
  • दुपारी ३ वाजता ठाकरे कुटुंब मुंबई विमानतळावर दाखल होतील.
  • दुपारी ३:३० वाजता ठाकरे कुटुंब मातोश्रीवर दाखल होतील.

Intro:शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सह परिवारअयोध्येत दाखल, राम लल्लाचे घेणार दर्शन

मुंबई 16

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाने ते सह परिवार अयोध्येयला पोहचले आहेत. पाहटे मुंबई विमानतळावरून त्यांनी अयोध्येला उड्डाण केले. शिवसेना नेते संजय राऊत होते. फैजाबाद विमानतळावर उतरल्यावर त्यांचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनीही गुलाब पुष्प देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. त्यांनतर ठाकरे यांचा ताफा आयोद्धेकडे रवाना झाला.

असा असेल उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम

सकाळी ९:३० वाजता राम जन्म भूमी स्थळावर जाणार्या मुख्य प्रवेश द्वारावर शिवसेनेचे सर्व खासदार दर्शनासाठी उपस्थित रहाणार.

सकाळी १० वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राम जन्म भूमी दर्शनासाठी येणार.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परीषद.
सकाळी ११ वाजता.
@हाँटेल पंचशिल
फैजाबाद-अयोध्या हायवे

दुपारी १ वाजता ठाकरे कुटुंब मुंबईसाठी विमानाने निघणार.

दुपारी ३ वाजता ठाकरे कुुुटुंब मुंबई विमानतळावर दाखल होतील.

दुपारी ३:३० वाजता ठाकरे कुटुंब मातोश्रीवर दाखल होतीलBody:.....Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.