मुंबई राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना - फुटीर शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय आपलाच असून आई भवानीवर माझा विश्वास आहे, अशा शब्दांत न्यायालयीन प्रकियेवर भाष्य केले. कितीही अफझलखान आले तरी घाबरणार नाही, असा सूचक इशारा भाजपला दिला. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते.
जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता Dussehra gathering 2022 . दसरा मेळाव्याच्या Dussehra gathering कितीतरी पटीने एक मेळावा इथेच झाला असता. मला फोन येत आहेत, कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही. भवानी मातेची कृपा आहे. ती कृपा नाही, तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिलंय. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी श्रद्धा आहे. तसेच तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे.Shiv Sena chief Uddhav Thackerayअशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीर शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय आपलाच असून आई भवानीवर माझा विश्वास आहे, अशा शब्दांत न्यायालयीन प्रकियेवर भाष्य केले. कितीही अफझलखान आले तरी घाबरणार नाही, असा सूचक इशारा भाजपला दिला. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते.
धाराशिव जिल्ह्याचे कौतुक शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधले. आताचे जे वातावरण आहे ते भारावून टाकणारे आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस न्यायालयात सुरू आहे, माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे, असा आत्मविश्वास व्यक्त करत तुळजाभवानीच्या दर्शनाला येणार असल्याची ग्वाही शिवसैनिकांना दिली. तसेच मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे कारण कैलासने काय केले हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले ते तुम्हा सर्वांना माहिती आहे, ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितले आहे. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे, परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असे ठाकरेंनी सांगितले.
दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने मोठा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मात्र सुप्रीम कोर्टात सध्या सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात चिंता आणि धाकधूक आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरूनही कार्यकर्त्यांचे मनोगत वाढवण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही ज्यांना मोठे केले ते खोक्यात गेले, मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये, ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता, तो ही दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने मोठा होईल, असे ठाकरे म्हणाले. मला सतत फोन येत आहेत कुठेही काही आपले वाकडे झालेले नाही, भवानी मातेची कृपा आहे, ती कृपा नाही तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिले आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी श्रद्धा आहे. तुमच्याकडे बघून भवानी मातेने मला देखील ही तलवार दिल्याची भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. शिवसैनिकांनी यानंतर एकच जयघोष करत शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.