ETV Bharat / city

Dussehra Melava : दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा? उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सभेच्या ध्वनी प्रदुषणाची आकडेवारी आली समोर

author img

By

Published : Oct 7, 2022, 8:16 AM IST

शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dussehra Melava of Shiv Sena and Shinde group) शिवतीर्थ व बीकेसी मैदानात ( Shivtirth and BKC Maidan mumbai ) पार पडला. शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आणि बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या तोफा धडाडल्या. सर्वाधिक आवाज हा शिवतीर्थावरच असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या ( Voice Foundation ) संचालकांनी सांगितले.

Shivatirtha Maidan
शिवतीर्थ मैदान

मुंबई : अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dussehra Melava of Shiv Sena and Shinde group) शिवतीर्थ व बीकेसी मैदानात ( Shivtirth and BKC Maidan mumbai ) पार पडला.शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आणि बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या तोफा धडाडल्या. दसरा मेळाव्यात सर्वाधिक आवाज शिवतीर्थावर झालेल्या सभेत होता. 80 ते 100 डेसिबल तर बीकेसी मैदानात 80 ते ९१ डेसिबल आवाज असल्याचा निष्कर्ष आवाज फाउंडेशनने ( Voice Foundation ) काढला आहे.

सर्वाधिक आवाज शिवतीर्थावर : मुंबईतील आवाज फाऊंडेशनने शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानात कुणाचा आवाज सर्वाधिक होता याची माहिती प्रसिद्ध केली. आवाज फाऊंडेशनच्या नोंदीनुसार सर्वाधिक शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात वाद्यांचा आवाज ८०.३ ते १०१.६ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. शिवसेना गीत वाजवण्यात आले त्यावेळी त्याचा आवाज ८६.५ डेसिबल ९१.३ डेसिबल आवाज होता. किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळी आवाज ८४.६ ते ९७ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. नितीन देशमुख यांच्या भाषणावेळी मैदानाबाहेर ढोल वाजवले जात असल्याने त्यांचे भाषण उपस्थितांना ऐकू जात नव्हते. देशमुखांच्या आवाजावेळी ८८.७ ते ९३.५ डेसिबल आवाज होता. तर, मैदानाबाहेरील आवाज ९३.५ डेसिबल होता. अंबादास दानवे ८७.४ ते ९६.६, सुभाष देसाई ८७.९ ते ९३.१, सुषमा अंधारे ७७.६ ते ९३.६, भास्कर जाधव ७५.४ ते ९२.१, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा आवाज ६८.६ ते ८८.४ डेसिबल होता. शिवसेना गीताचा आवाज ८० ते ८६.२ डेसिबल असल्याचा निष्कर्ष आवाज फाउंडेशनने काढला आहे.

Voice Foundation
आवाज फाउंडेशन

बीकेसी मैदानात 80 ते ९१ डेसिबल आवाज : बीकेसी मैदानातील एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात किरण पावसकर यांच्या भाषण वेळी आवाज ७८.७ ते ८८.५ डेसिबल पर्यंत पोहोचला होता. शहाजी पाटील यांच्या भाषणावेळी ८२.४, राहूल शेवाळे ७८.८, धैर्यशील माने ८८.५, भावना गवळी ८३.९, शरद पोंक्षे ८२.८, गुलाबराव पाटील ८१.१ ते ८६, रामदास कदम ८२.२ डेसिबल तर एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी आवाज ८३.५ ते ८९.६ डेसिबल पर्यंत असल्याची नोंद आवाज फाउंडेशनने नोंदवली आहे. त्यामुळे सर्वाधिक आवाज हा शिवतीर्थावरच असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या संचालक सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.