ETV Bharat / city

Attack Kirit Somaiya Car : किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला - Kirit Somaiya Car Attack

किरीट सोमैया यांच्या वाहनांवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यांच्या वाहनाची काच फोडण्यात आली ( Shivsena Activists Smashed Kirit Somaiya Car ) आहे. यामध्ये किरीट सोमैया किरकोळ जखमी झाले आहेत. सोमैया राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुर्णपणे ढवळे आहे.

किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

author img

By

Published : Apr 24, 2022, 7:08 AM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

राणा दाम्पत्याला अटक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिले होते. मुंबईत दोन दिवस शिवसैनिक मातोश्रीला सुरक्षा देत होते. त्याचवेळी राणा यांच्या खार येथील निवासस्थानी शिवसैनिक चाल करून गेले होते. राणा यांना कालच पोलिसांनी 149 ची नोटीस दिली होती. आज त्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असल्याने माघार घेतली होती. मात्र, राणा यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात शिवसेनेकडून तक्रार दाखल केल्यावर आज राणा दाम्पत्यांना अटक केली आहे.

सोमय्या यांच्यावर हल्ला - खार पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला भाजपा नेते किरीट सोमय्या भेटायला आले असता शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या हे पोलीस ठाण्याबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चपलांचा मारा केला. तसेच, दगडही गाडीवर मारण्यात आले. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून त्याप्रकरणी सोमय्या हे बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले आहेत.

हेही वाचा - राणा दाम्पत्याला अखेर अटक; सकाळपासून मुंबईत रंगले आंदोलन, प्रतिआंदोलनाचे नाटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.