मुंबई - कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील बेपत्ता ज्येष्ठ नागरिकांचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकावर सापडला. याला सर्वस्वी मुंबई महापालिका व सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.
हॉस्पिटल प्रशासनाला फक्त दोष देणे योग्य नाही. मुंबईतील जवळपास सर्व हॉस्पिटलच्या क्षमता संपल्या आहेत आणि हे कोरोनाच्या या महामारीत सिद्ध झाले आहे. अनेकांचा रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे मृत्यू होतो आहे. तर काही खासगी रुग्णालय उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत आहेत.
हेही वाचा... शताब्दी रुग्णालयातून गायब झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह सापडला रेल्वे स्थानकात
सत्ताधारी फेसबुक लाईव्हवरून खोटे आकडेवारी सांगत आहेत. फक्त फेसबुकवरून गोड गोड बोलू नये. ते त्यांनी बंद करावे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पालिका रुग्णालयांची स्थितीची पाहणी करावी, असा सल्ला अखिल चित्रे यांनी ठाकरे सरकारला दिला.