ETV Bharat / city

शर्मिला टागोर, प्यारेलाल शर्मा, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत.

dinanath mangeshkar awards
dinanath mangeshkar awards
author img

By

Published : Apr 24, 2021, 5:24 PM IST

मुंबई - मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या ७९व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीत हा पुरस्कार सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत होणार नसून त्यांना ते पुरस्कार घरपोच पोहोचवले जातील, असे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कळविले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

मंगेशकर कुटुंब गेल्या ७९ वर्षांपासून त्यांच्या वडिलांची, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी साजरी करत आहे. यापूर्वी हा उत्सव खाजगी कार्यक्रम असायचा आणि १९८८ पासून तो सार्वजनिक रूपात साजरा केला जातो आहे. जे गायक, संगीतकार, नाटककार, चित्रपट कलाकार आणि अन्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतात ते महाराष्ट्र व भारतवासीयांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगेशकर कुटुंब या सर्वांचा सन्मान करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करता आलेलं नाही. यावर्षी वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना २०२० साठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख ११ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचं स्वरुप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.