मुंबई - अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे (एएनयू) माजी विद्यार्थी नेते शरजील उस्मानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कोर्टाने म्हटले आहे की, पोलिसांनी बळावर कारवाई करू नये.
पोलिसांनी सक्तीने कारवाई करू नये-
पुणे पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती करून उस्मानी यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच उस्मानी यांनी याचिकेत म्हटले होते की, सुनावणी प्रलंबित असताना पोलिसांनी सक्तीने कारवाई करू नये, असे कोर्टाने निर्देश दिले पाहिजेत.
स्वारगेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल-
एल्गार परिषदेचा कार्यक्रम जानेवारीत पार पडला. यावेळी उस्मानी यांनी भाषणे केली. यावेळी त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे दोन समाजात द्वेष वाढू शकेल असा आरोप आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानीविरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात दिली तक्रार-
प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली. पुण्यात 30 जानेवारी 2021 रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात उस्मानी यांनी हिंदू समाज, भारतीय न्यायव्यवस्था आणि संसदेविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. उस्मानी यांनी याचिकेत दावा केला आहे की, त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतर कोणतीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडला नाही.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले - भास्कर जाधव