मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी परिवहन मंत्री एसटी कर्मचारी आणि संघटनांशी चर्चा करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढवून द्यावा (Increase payment of ST Workers), अशा सूचना केल्या असल्याची माहिती आहे.
एसटी महामंडळात राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अशी मुख्य मागणी एसटी कर्मचाऱ्यांची असली तरी सध्या विलीनीकरणाचा मार्ग सोपा नसल्याने या संपामध्ये तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. याबाबत राज्य सरकारवर काही आर्थिक भार पडेल त्यासाठी एक विशेष तरतूद करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनादेखील शरद पवार यांनी सूचना केली असल्याची माहिती आहे.
पगारवाढीबाबत एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा मार्ग सध्या सोपा नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ दिली जाईल. याबाबत आज (मंगळवार) परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तसेच एसटी कर्मचाऱ्यांसोबत पगारवाढीबाबत चर्चा केली आहे. गठित केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्याला घसघशीत पगार देण्यासाठी राज्य सरकार दोन पाउले पुढे गेले असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.
हे ही वाचा - st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव