मुंबई - मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले ( ED Take Custody Nawab Malik ) आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक दोषी असून, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी ( Sharad Pawar Should Resign Malik ) सोमैयांनी केली आहे.
किरीट सोमैया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन येथे भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमैया म्हणाले, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा दावा करत त्याची घरपट्टी भरतात. तर दुसरीकडे आता हे बंगले अस्तित्वात नाही, असे सांगितले जाते. मग हा पाच कोटीचा भ्रष्टाचार कोणी केला. ही संपत्ती कुठून आली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी विनंती किरीट सोमैया यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.
प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेते मंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. त्यानंतर आज सकाळी ( बुधावर ) ईडीने मंत्री नबाव मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Yashomati Thakur On Ed : पुन्हा येईन.. यासाठीच ईडीच्या कारवाया! - ॲड. यशोमती ठाकूर