ETV Bharat / city

26/11 Attack : Shamsher Pathan allegations : कसाबकडील मोबाईल फोन परमबीर सिंग यांनी लपवला, माजी पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण ( Shamsher Pathan allegations ) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप ( Shamsher Pathan allegations against Param Bir Singh ) केले आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पोलिसांनी पकडले, त्यावेळी अजमल कसाब याच्याकडे सापडलेला मोबाईल फोन परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांनी लपवला, असा खळबळजनक आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे.

Shamsher Pathan allegations Param Bir Singh
परमबीर सिंग कसाब फोन लपवला आरोप
author img

By

Published : Nov 25, 2021, 7:10 PM IST

Updated : Nov 26, 2021, 12:31 PM IST

मुंबई - माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण ( Shamsher Pathan allegations ) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप ( Shamsher Pathan allegations against Param Bir Singh ) केले आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पोलिसांनी पकडले, त्यावेळी अजमल कसाब याच्याकडे सापडलेला मोबाईल फोन परमबीर सिंग ( Param Bir Singh ) यांनी लपवला, असा खळबळजनक आरोप शमशेर पठाण यांनी केला आहे.

माहिती देताना माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण

हेही वाचा - Mumbai Council election result शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड

प्रश्न - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर तुम्ही खळबळजनक आरोप लावला आहे?

उत्तर - मी केलेले वक्तव्य हे आरोप नसून वस्तुस्थिती आहे. 26/11 च्या घटनेवेळी अजमल कसाब याला पोलिसांनी जिवंत पकडले. त्यावेळेस तिथे असलेल्या कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याने अजमल कसाब याचा मोबाईल फोन ( Ajmal Kasab mobile phone ) ताब्यात घेतला होता. मात्र, त्यावेळी परमबीर सिंह एटीएसचे डीआयजी म्हणून कार्यरत होते. त्यांनी तो मोबाईल फोन पोलीस कर्मचाऱ्याकडून घेतला. मात्र, पोलीस कर्मचार्‍याने चौकशीदरम्यान पुन्हा एकदा परमबीर यांच्याकडून फोन मागून सुद्धा तो देण्यात आला नव्हता. नंतर चौकशी दरम्यान त्यांनी तो फोन दिला असेल, असे मला वाटले. मात्र, आता परमबीर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मी या फोनबाबत चौकशी केली असता अद्यापही तो फोन मिळाला नसल्याचे समोर आले. त्या मोबाईलचा उपयोग अवैधरीत्या पैसे कमवण्यासाठी किंवा आयएसआयला विकण्यासाठी वापरला गेला असेल, असा माझा संशय आहे. त्यामुळे, याबाबत मी तक्रार केली आहे. याबाबत चौकशी व्हावी यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी आता या संदर्भात गांभीर्याने चौकशी करून परमबीर यांना तात्काळ अटक करावी, अशी माझी मागणी आहे. माझ्या तक्रारीच्या पत्राचे केवळ प्रसिद्धीसाठी वापर करू नये, असे माझे मत आहे. त्यामुळे, लवकरात लवकर परमबीर सिंह यांना 26/11 च्या प्रकरणात अटक करावी, अशी माझी मुख्य मागणी आहे.

प्रश्न - या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार का?

उत्तर - याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार अतिशय उत्तमरित्या चालवत आहेत. मात्र, त्यांच्यासोबत असणारे काही अधिकारी आणि मंत्री योग्य काम करत नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील हे अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. परमबीर सिंह कुठे होते? याबाबत देखील माहिती काढता आली नाही. त्यामुळे, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्याला अकार्यक्षम गृहमंत्री मिळत आहेत, ही महाराष्ट्राची नाचक्की आहे. तपास यंत्रणेचे कोठेही फेल्युअर नाही. परमबीर सिंग हे तपास यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी होते, असे मी मानतो. पण, 26/11 चे प्रकरण कार्यक्षम पोलीस अधिकारी आणि तपास यंत्रणेमुळे पूर्ण झाले.

प्रश्न - या सर्व प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा करणार का?

उत्तर - या सर्व प्रकरणाचा मी पाठपुरावा करणार आहे. म्हणूनच मी यासंबंधी अर्ज केला आहे. जर, कारवाई झाली नाही तर, अधिकार्‍यांवरचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार.

हेही वाचा - ST Workers Strike : एसटी संपातून भाजपची माघार, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी

Last Updated : Nov 26, 2021, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.