मुंबई - क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान गेल्या 19 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पेपर वर्क करण्यासाठी NCB ची टीम गुरुवारी शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्यावर गेली होती. त्यासंदर्भातले पेपर एका बंद फाईलमध्ये घेऊन शाहरुखचा बॉडीगार्ड आज NCB कार्यालयात आला होता.
- एनसीची अधिकारी गुरुवारी 'मन्नत' आणि अनन्याच्या घरी पोहचले होते -
हेही वाचा - एजाज खानच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी
गुरुवारी(21 ऑक्टोबर) एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेच्या घरी पोहचले होते. तसेच शाहरूख खानच्या 'मन्नत' या बंगल्यावरही एनसीबी अधिकारी गेले होते. अनन्या पांडे ही आर्यन खानची मैत्रीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनचे काही whats app चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता अनन्या पांडेची चौकशी सध्या एनसीबीकडून सुरू आहे.
- एनसीबी पुढे काय करणार ?
आज अनन्या पांडेची चौकशी संपली आहे. साधारण चार तास ही चौकशी करण्यात आली. अनन्याने एनसीबीला काय उत्तरं दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच येत्या सोमवारी अनन्याला पुन्हा चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स देण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी तिची पुन्हा एनसीबीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
- नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी क्रूझवर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे whats app चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दोघांमधील चॅट एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केले होते.
हेही वाचा - Ananya Panday : अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी; सोमवारी पुन्हा बोलावले