ETV Bharat / city

2021 Year Ender : 'या' नेत्यांची झाली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी ! - या नेत्यांची ईडीकडून चौकशी

2021 मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्या नेत्याला चौकशीला सामोरे जावं लागलं. तसेच कोणत्या नेत्यांवर गंभीर आरोप झाले, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट...

2021 Year Ender
2021 Year Ender
author img

By

Published : Dec 27, 2021, 7:38 AM IST

Updated : Dec 28, 2021, 8:15 AM IST

मुंबई - 2021 हे वर्ष खऱ्या अर्थाने वादळी ठरले. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर यावर्षी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यापैकी काही नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्या नेत्याला चौकशीला सामोरे जावं लागलं. तसेच कोणत्या नेत्यांवर गंभीर आरोप झाले, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट...

अजित पवार -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ED Enquiry ) त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये आपल्या नातेवाईकांना लाभ पोहचवण्यासाठी कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले असल्याचा आरोप भाजपाचा नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या. अजित पवार यांच्या सख्ख्या तीन बहिणींच्या संस्थांची तपासणी प्राप्तीकर विभागाकडून सहा दिवस सुरू होती. तसेच अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांच्याही मुंबईमधील अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाकडून सहा दिवस तपासणी सुरू होती. याबाबत खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

अजित पवार
अजित पवार

नवाब मलिक -

13 जानेवारी 2021 ला नवाब मलिक ( Nawab Malik ED Enquiry ) यांचे जावई समीर खान यांच्यावर (अमली पदार्थ विरोधी पथक) एनसीबीने कारवाई करत त्यांना अटक केली होती. यावेळी समीर खान यांच्या जवळ दोनशे किलो गांजा सापडला असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली. या प्रकरणात समीर खान यांना जवळपास साडे आठ महिने तुरुंगात राहावं लागलं. मात्र त्या प्रकरणात समीर खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. समीर खान यांच्याकडे 200 किलो गांजा सापडलेला नाही. तसेच इतर कोणतेही अमली पदार्थ समीर खानकडे सापडले नाहीत. केवळ राजकीय सूडापोटी केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच एनसीबीच्या या कारवाईनंतर एनसीपी चे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी ही नोकरी मिळवली असल्याची गंभीर आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला.

नवाब मलिक
नवाब मलिक

अनिल देशमुख -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ED Enquiry ) यांच्या मुंबई तसेच नागपूर मधील घरावर 2021 साली सीबीआय तसेच ईढीकडून धाडसत्र सुरू राहिले. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पाच वेळा समन्स बजावले होते. त्यानंतर अनिल देशमुख 2 नोव्हेंबरला टीव्ही कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. अद्यापही त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. तसेच ईडीकडून अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता देखील जप्त करण्यात आली. यासोबतच अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहेत.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

एकनाथ खडसे -

राज्याचे महसूल मंत्री असताना भोसरी एमआयडीसीतील जवळपास साडेतीन एकर जमिनी खरेदी प्रकरणात आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका एकनाथ खडसे ( Eknath Khadse ED Enquiry ) यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांचे जावई गिरीश चौधरी आणि पत्नी मंदाकिनी खडसे यांचीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

हसन मुश्रीफ -

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ED Enquiry ) यांनी गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया न करता ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनीचे मालक मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई असून या कंपनीचे बेनामी मालक असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

अनिल परब -

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab ED Enquiry ) यांना ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडून दोन वेळा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर अनिल परब हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. दापोली ते रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अद्यापही अनिल परब यांच्यावर कारवाईची टांगती तलवार पाहायला मिळतेय. अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे 10 कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमय्या यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

अनिल परब
अनिल परब

आनंदराव अडसूळ -

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ( Anandrao Vithoba Adsul ED Enquiry ) यांना 27 सप्टेंबर रोजी ईडीने ताब्यात घेतल. आनंदराव अडसूळ हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून गणलं जातं. मात्र आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरु असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याही अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

प्रताप सरनाईक -

प्रताप सरनाईक यांनी ( Pratap Sarnaik ED Enquiry ) एनएसईएलमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली. याबाबत वेळोवेळी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.

रवींद्र वायकर -

रविंद्र वायकर यांनी ( Ravindra Waikar ED Enquiry )अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून 30 जमीनीचे करार करण्यात आले. जमीनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील 19 बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Kishori Pednekar ED Enquiry ) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येणाऱ्या सनदीका मधून मुंबईतील जवळपास सहा फ्लॅट लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 2003 साली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत वरळीमध्ये देण्यात आलेल्या 230 फ्लॅटमधील सहा फ्लॅट किशोरी पेडणेकर यांनी घेतले. यावेळी किशोरी पेडणेकर या प्रभागांमध्ये नगरसेविका होत्या. त्यावेळेस हा अपहार झाल्याच किरीट सोमय्या यांचा आरोप आहे. तसेच कोविड काळामध्ये महानगरपालिका अंतर्गत कोविड सेंटर उभारण्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचाही आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

भावना गवळी -

भावना गवळी ( Bhavana Gawali ED Enquiry ) यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. हे परिवर्तन करत असताना भावना गवळी यांनी खोटी कागदपत्र सादर केली. खोटी कागदपत्रे सादर करून ट्रस्टचे रूपांतर कंपनीमध्ये केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा घोटाळा जवळपास शंभर कोटी असल्याचा अंदाजही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय. याबाबत कारवाई करत ईडीकडून 28 सप्टेंबर रोजीला सईद खान या संचालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भावना गवळी यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

यशवंत जाधव आणि यामिनी जाधव -

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी ( Yashwant jadhav and Yamini Jadhav on IT Radar) दुबईत असलेल्या 'सिनर्जीत व्हेंचर्स' आणि 'सईद डोन शारजा' या दोन कंपन्या तयार करून त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीत पैसा लावण्यासाठी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जाधव यांना पैसे दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोलकत्ता मधील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी असल्याचाही आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी केलाय. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड उपचारासाठी जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. तसेच इतर बाबतीत जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्या कॉन्टॅक्टमधून केलेल्या काळा बाजारातून हा पैसा उभा करण्यात आला. त्यानंतर या काळ्या पैशाला मनी लॉन्ड्रिंग करून दुबईत गुंतवणूक करण्यात आली आहे. जवळपास पंधरा कोटी रुपये दुबईच्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचा संशय आरोपही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

यशवंत जाधव
यशवंत जाधव

मिलिंद नार्वेकर -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी ( Milind Narvekar ED Enquiry ) दापोली समुद्रकिनाऱ्या जवळ अनाधिकृत बंगला बांधला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला अनधिकृत बंगला पाडला गेला.

मिलिंद नार्वेकर
मिलिंद नार्वेकर

हेही वाचा - Kalicharan Controversial Statement : धर्मसंसदेत कालीचरण यांच्याकडून राष्ट्रपित्यांबद्दल अपशब्द, महंत रामसुंदर दास म्हणाले...

हेही वाचा - 27 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांनी आज नकारात्मक विचारांपासून दूर राहावे; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Last Updated : Dec 28, 2021, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.