मुंबई - देशात कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron in India) खळबळ उडवली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे (Omicron in Maharashtra) पुन्हा 7 नवे रुग्ण आढळले आहेत. यात गंभीर बाब म्हणजे या नव्या 7 रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा ( 3-yr Old From Maharashtra Tests Positive) आहे. तर एकूण महाराष्ट्रात ओमायक्रॉनची बाधा झालेले 17 रुग्ण आहेत.
सात रुग्णांपैकी चार रुग्णांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. एका रुग्णाने कोविड लसीची एक मात्रा घेतलेली आहे, तर एका रुग्णाने एकही मात्रा घेतलेली नाही. अन्य एक रुग्ण हे साडे तीन वर्षाचं बालक असल्याने, त्यालाही कोविड लसीची मात्रा देण्यात आलेली नाही. या तीन रुग्णांमध्ये आजाराची सौम्य लक्षणं दिसत असून, इतर चौघांमध्ये मात्र काहीही लक्षणं दिसत नसल्याचं, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आला आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईमध्ये (Omicron in Mumbai ) जमावबंदीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने 11 आणि 12 डिसेंबर रोजी मुंबईत कलम 144 CrPC (144 CrPC imposed in Mumbai ) लागू केले आहे. रॅली/मोर्चे/मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासन कोरोना आणि ओमायक्रॉन यांच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ओमायक्रॉनबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या सुरू आहेत. संसर्ग झपाट्याने पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आतापार्यंत 17 प्रवासी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह -
राज्यात अति जोखमीच्या देशातून 9678 तर इतर देशातून 51 हजार 761 असे एकूण 61 हजार 439 प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील 9678 तर इतर देशातील 1249 अशा एकूण 10 हजार 927 प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले 20 तर इतर देशातून आलेले 5 अशा एकूण 25 प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 17 प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. 1 नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 89 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 47 जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
घाबरण्याची आवश्यकता नाही, मात्र काळजी घ्यावी -
ओमायक्रॉन हा कोरोनाच नवा व्हेरिएंट (Omicron Variant) आहे. यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत (Omicron Found In South Africa) आढळून आला. या व्हेरिएंटचा प्रसार फार झपाट्याने होतो आहे. असे असले तरी यामुळे कोणाचा मृत्यू वगैरे होण्याची भीती नाही. हे आतापर्यंतच्या अभ्यासात तरी आढळून आलेले आहे. मात्र, प्रत्येकाने काळजी बाळगणे गरजेचे असल्याचेही डॉ. जयंत पांढरीकर (Dr Jayant Pandharikar) यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - ETV BHARAT SPECIAL - पाहा.. राज्यातील ओमायक्रॉन स्थितीचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट