मुंबई - भारतीय शेअर मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी दिसून आलेली आहे. परदेशात आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजी आली आहे. या तेजीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सेन्सेक्सने प्रथमच। 55000 अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. दररोज नवनवे विक्रम करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत.
आयटी आणि फायनान्स क्षेत्रात शेअरची चांगले दिवस आले असून या शेअरची जोरदार खरेदी झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 245 अंकांच्या वाढीसह 55088 अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 75 अंकांनी वधारला असून तो 16440 अंकांवर आहे.
सकाळी बाजार सुरू होताच शेअर मार्केटचे सेन्सेक्सने उसळी घ्यायला सुरुवात केली होती. बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 168 अंकांची झेप घेतली 55011 अंकावर पोहोचला.
टाटा स्टील, टेक महिंद्रा, सन फार्मा, पॉवरग्रीड या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे झाली आहे. तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, टाटा मोटर्स या शेअरमध्ये जोरदार कमाई केली आहे.
कोरोनाचा कमी झालेला धोका तसेच विविध टप्प्यावरील उद्योग क्षेत्रांमध्ये प्राप्त होणारी तेजी यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा गती निर्माण करत असल्याने याचा सकारात्मक बदल आगामी काळात होणारनअसल्याचे संकेत असून याचा भारतीय बाजाराला फायदा होणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. निफ्टी निर्देशांकांनी तेजीचा सूर कायम ठेवला आहे.