ETV Bharat / city

वृद्ध रुग्णांबाबत पालिकेचा यूटर्न, आता घरातच 'क्वारंटाईन' करणार - मुंबई कोरोना स्थिती

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत तर पालिका आणि कोविड सेंटरमध्ये उपचार करून घेण्यास बहुसंख्य नागरिक तयार होत नाहीत. यासाठी पालिकेने आपल्या निर्णयावरून यूटर्न घेत वयोवृद्ध रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता वयोवृद्ध रुग्णांना घरातच क्वारंटाईन केले जाणार आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Sep 15, 2020, 1:53 AM IST

मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रसार सुरूच असून मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. वयोवृद्ध रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयातच वयोवृद्ध रुग्णांवर उपचार केले जातील, असे पालिकेने २१ ऑगस्टला जाहीर केले. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत तर पालिका आणि कोविड सेंटरमध्ये उपचार करून घेण्यास बहुसंख्य नागरिक तयार होत नाहीत. यासाठी पालिकेने आपल्या निर्णयावरून यूटर्न घेत वयोवृद्ध रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता वयोवृद्ध रुग्णांना घरातच क्वारंटाईन केले जाणार आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना पालिकेचा आरोग्य विभाग रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. मुंबईत जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांत ७० ते ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन केले जात होते. मात्र कोरोनामुळे वयोवृद्ध रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा मृत्यूदर रोखण्यासाठी पालिकेने लक्षणे नसलेल्या पण ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना रुग्णालयात, कोरोना सेंटर्समध्ये उपचारासाठी दाखल होणे सक्तीचे केले. ज्येष्ठांना चांगल्या देखभालीसह चांगले उपचार मिळावेत, यासाठी नातेवाईकांकडून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊ लागले. त्यामुळे खासगी रुग्णालयात कोरोना झालेल्या पण लक्षणे नसलेल्या ज्येष्ठांची संख्या वाढली. यामुळे कोरोना झालेल्या इतर रुग्णांना बेड मिळेनासे झाले. कोरोनाच्या सर्व रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत म्हणून पालिकेने लक्षणे नसलेल्या वृद्धांना घरातच क्वारंटाईन करावे, असे निर्देश नव्याने दिले आहेत. मुंबईत कोरोनामुळे वृद्ध दगावण्याचे प्रमाण हे ५७ टक्के इतके आहे.

हेही वाचा - नव्वदी पार दोघांची कोरोनावर मात, रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन परतले घरी

मुंबईत सध्या इमारती आणि उच्चभ्रूंच्या वस्तींमधून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पालिकेच्या आधीच्या नियमामुळे अशा इमारती किंवा घरातील कोरोना झालेल्या ज्येष्ठ रुग्णांना पालिका रुग्णालयात दाखल व्हायचे नसायचे. त्यामुळे ते खासगी रुग्णालयांकडे जात होते. त्यामुळे खासगी रुग्णालयात बेड मिळेनासे झाले. पण खरे तर वृद्ध रुग्णालयापेक्षा घरातील प्रेमळ माणसांच्या सहवासात राहणे अधिक पसंत करतात. अशा रुग्णांवर वॉररूमच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्यांच्या उपचारांचा फॉलोअ‍प घेतला जातो, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

हेही वाचा - सोमवारी मुंबईत कोरोनाच्या नव्या 2256 रुग्णांची नोंद, 31 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.