ETV Bharat / city

राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या नेत्यांना केंद्राचे सुरक्षा कवच! - centers protection to Navneet Rana

New Summary - राज्य सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना ( Kirit Somaiya protection by the Center ) केंद्र सरकारने सुरक्षा दिली. यानंतर आता राज्य सरकारच्या विरोधात लोकसभेत गंभीर आरोप करणाऱ्या नवनीत राणा ( centers protection to Navneet Rana ) यांनाही केंद्र सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा ( Y plus security by gov ) देण्यात आली आहे.

केंद्राचे सुरक्षा कवच!
केंद्राचे सुरक्षा कवच!
author img

By

Published : Apr 14, 2022, 12:34 PM IST

Updated : Apr 14, 2022, 3:17 PM IST

मुंबई - राज्य सरकारवर एकामागून एक गंभीर आरोप करणाऱ्या नेत्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षेचं कवच दिलं जात. राज्य सरकार वर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली. यानंतर आता राज्य सरकारच्या विरोधात लोकसभेत गंभीर आरोप करणाऱ्या नवनीत राणा यांनाही केंद्र सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्य सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना ( Kirit Somaiya protection by the Center ) केंद्र सरकारने सुरक्षा दिली. यानंतर आता राज्य सरकारच्या विरोधात लोकसभेत गंभीर आरोप करणाऱ्या नवनीत राणा ( centers protection to Navneet Rana ) यांनाही केंद्र सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा ( Y plus security by gov ) देण्यात आली आहे.

नवनीत राणा यांना सुरक्षा - खासदार नवनीत राणा यांना देखील आता केंद्राने Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या वादावरून स्थानिक पोलीस आणि खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. या झालेल्या वादात स्थानिक पोलिसांकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक पोलिसांकडून देण्यात आली. बेकायदेशीररित्या पोलीस आपल्या घरात घुसले होते. पोलिसांनी आपल्या व आपल्या कुटुंबाला ही धमकावलं असे गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केले होते. त्याची दखल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी घेऊन नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. नवनीत राणा या नेहमीच महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलत असतात. लोकसभेत तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याकारणाने राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी देखील नवनीत राणा यांनी केली होती. नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्यासोबत 11 जणांची टीम रात्रंदिवस त्यांची सुरक्षा करणार आहे. या टीम मध्ये 2 कमांडो आणि अर्ध सैनिक दलाचे जवान असणार आहेत.

सोमय्या यांना Z दर्जाची सुरक्षा - महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्यांवर आणि नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनादेखील केंद्र सरकार कडून झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर अनेक मंत्र्यांवर त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्य सरकार आणि किरीट सोमय्या यांच्यात नेहमीच वाद होताना पाहायला मिळतात. दोन वेळा यांच्यावर हल्लेही झाले आहेत. मात्र त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांना देण्यात आलेल्या झेड सुरक्षा अंतर्गत त्यांच्यासोबत 22 जवानांची टीम तैनात करण्यात आल. यात 4 ते 5 एन एस जी चे कमांडो, एक एस्कॉर्ट वाहन, आणि इतर जवान आहेत. याच्या कडून अहोरात्र त्यांची सुरक्षा या टीम कडून केली जाते.

कंगनाला ही Y दर्जाची सुरक्षा - अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनाच वाद सर्वानाच माहीत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्ये नंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. बॉलिवूडमध्ये सरकारला हाताशी धरून ड्रग्सचा व्यापार केला जातो. याबाबत पोलिसांना ही सर्व माहिती असून त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही अशाच प्रकारचे गंभीर आरोप कंगना कडून करण्यात आले. या वादा दरम्यानच मुंबई महानगरपालिकेकडून कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याचे म्हणत तोडक कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर कंगना अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या कारवाई नंतर कंगणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होतं. या सर्व वादावर कंगना आणि राज्यसरकार यांच्यात कायदेशीर लढाई देखील सुरू आहे. मात्र या वादातच कंगणाला केंद्र सरकार कडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली.

हेही वाचा-नवनीत राणांच्या जीवाला धोका, केंद्र सरकारने पुरवली वाय प्लस सुरक्षा

हेही वाचा-MP Navneet Rana Dance Video : विद्यार्थिनींच्या आग्रहास्तवर खासदार नवनीत राणांनी केले नृत्य, पाहा VIDEO

हेही वाचा-Navneet Rana Hanuman Chalisa : खासदार नवनीत राणांचे दोन हजार महिलांसोबत हनुमान चालीसा पठन

Last Updated : Apr 14, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.