ETV Bharat / city

नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांना ईडीकडून दुसरे समन्स - फराज मलिक समन्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक ( Nawab Malik son Faraz Malik summon ) यांना ईडीने मंगळवारी दुसरे समन्स पाठवले असून, चौकशीकरिता बोलावले आहे.

ED
ईडी
author img

By

Published : Mar 16, 2022, 10:38 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक ( Nawab Malik son Faraz Malik summon ) यांना ईडीने मंगळवारी दुसरे समन्स पाठवले असून, चौकशीकरिता बोलावले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्‍यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणात ईडीकडून प्रश्‍न विचारले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Nilesh Rane Has Tweet : मुख्यमंत्रीच कालबाह्य गाडीत फिरतात! नितेश राणेंच्या ट्विटने नवा वाद

फराज मलिक यांना ईडीने यापूर्वी देखील समन्स पाठवले होते, मात्र ते ईडी कार्यालयात चौकशीला समोर आले नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत कार्यालयात काही वेळ देण्यात यावा याकरिता ईडीला अर्ज दिला होता. मात्र, ईडीने तेव्हा अर्ज मंजूर केला नव्हता. त्यानंतर पुन्हा 15 मार्च रोजी ईडीने फराज मलिक यांना समन्स पाठवले असून चौकशीला बोलवले आहे. विशेष म्हणजे, कालच नवाब मलिक यांचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ईडीने नवाब मलिक यांच्या मुलाला समन्स पाठवल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा - MNS activists smashed IPL Bus : वाहतुकीचे काम स्थानिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी IPL ची बस फोडली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.