मुंबई - मराठीच्या जनजागृतीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत आहे. तसेच अभिजात मराठीची महती सांगणारे प्रदर्शनदेखील मंत्रालय परिसरात भरविण्यात आले आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले, उर्मिला धादवड आदी उपस्थित होते.
