ETV Bharat / city

शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट - Pawar-Raut meeting at Pawar's "Silver Oak" residence

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील राहत्या घरी जाऊन सपत्नीक भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही औपचारिक भेट असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Sanjay Raut went with his wife to visit Sharad Pawar
संजय राऊत शरद पवार यांची भेट
author img

By

Published : Nov 9, 2021, 11:39 AM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील राहत्या घरी जाऊन सपत्नीक भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही औपचारिक भेट असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विरोधकांच्या आरोपाबाबत भेटीदरम्यान चर्चा
कॉर्डिलिया क्रूज प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असून, हे पूर्ण प्रकरणाचं बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी या सर्व प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज माफिया आणि दाऊदचा हस्तक चिंकू पठाण याच्याशी सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : ज्ञानदेव वानखडे यांच्याकडून नवाब मलिकांवर मानहानीची तक्रार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.